1. सरकारी योजना

खुशखबर! केंद्र सरकार पीएम किसान योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये; अशी करा नोंदणी

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी महत्वाची पाऊले उचलत आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहेत. त्यातील महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हफ्त्यांचे पैसे जमा झाले आहेत.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
central government yojana

central government yojana

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी महत्वाची पाऊले उचलत आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार (Central Government) अनेक योजना राबवत आहेत. त्यातील महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान (PM Kisan) योजना होय. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हफ्त्यांचे पैसे जमा झाले आहेत.

मात्र १२ वा हफ्ता येणे अद्यापही बाकी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ वा हफ्ता वर्ग केला जाऊ शकतो. मात्र, सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशिवाय पीएम किसान मानधन योजनेतूनही शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेंतर्गत ६० हून अधिक शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जात आहेत.

हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात

या योजनेसाठी फक्त तेच शेतकरी नोंदणी करू शकतात, ज्यांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. याशिवाय शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 30 व्या वर्षी 110 रुपये, वयाच्या 40 व्या वर्षी 200 रुपये महिना भरावे लागतील.

शेतकऱ्यांनो सावधान! लिंबूनीच्या झाडांना लीफ मायनर कीटकांचा धोका; ही आहेत लक्षणे

वार्षिक 36 हजार रुपये दिले जातील

ही रक्कम या योजनेंतर्गत ६० वर्षांसाठी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर त्याचा परतावा शेतकऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात दिला जाईल. या योजनेंतर्गत सरकार दरमहा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन (Pension) देणार आहे, म्हणजे एका वर्षात ३६ हजार रुपये.

आनंदाची बातमी! कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल डिझेलही स्वस्त, जाणून घ्या नवे दर...

मानधन योजनेसाठी नोंदणी करा

पीएम किसान मानधन योजनेसाठी, प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.
तेथे तुम्हाला तुमची, कुटुंबाची, वार्षिक उत्पन्नाची आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
यासोबतच पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तेथे सापडलेला अर्ज तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करा.
यानंतर तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल.

महत्वाच्या बातम्या:
कांद्याच्या दरात वाढ! शेतकऱ्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे बाजारभाव
एकदम झक्कास! नोकरी सोडली आणि शेती केली; वर्षाला कमावतेय १ कोटी रुपये

English Summary: Good news! central government is giving 36 thousand rupees to the farmers Published on: 16 September 2022, 01:46 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters