Digital Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने रेशन कार्डबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचा रेशन कार्डधारकांना नक्कीच फायदा होईल. सरकारने आता नियमात बदल करत ग्राहकांना 'डिजिटल रेशन कार्ड' देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत अनेक गरजू नागरिकांना याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे आता आगामी काळात हे रेशन कार्ड डिजिटल करण्याचे सरकारचे प्रयत्न चालू आहेत.
गहू तसेच तांदूळ यांचा लाभ घेण्यासाठी लाभार्त्यांना डिजिटल कार्ड दाखवावे लागेल. उत्तराखंड सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी डिजिटल रेशन कार्ड वितरित केली आहे. आतापर्यंत जवळजवळ १२ लाखांहून अधिक लोकांना डिजिटल रेशन कार्ड देण्यात आले आहे. कोरोनामुळे डिजिटल कार्ड प्रकल्पाला विलंब झाला होता मात्र आता डिजिटल कार्ड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती अन्नमंत्री रेखा आर्य यांनी दिली.
जुलै अखेरपर्यंत सर्व ग्राहकांना डिजिटल रेशन कार्ड मिळणार असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. अन्नमंत्री रेखा आर्य पुढे असंही म्हणाल्या,
३० मे पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये १३ लाख ४६ हजार ६३२ नवीन शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. आर्थिक सर्वेक्षणाशिवाय रेशनकार्ड सरेंडर याबाबत बोलताना रेखा आर्य म्हणाल्या की, या कामासाठी आर्थिक पाहणी अहवालाची गरज नाही.जुलै २०१३ साली रेशन कार्ड बनवण्याच्या निकषानुसार नियमाविरुद्ध बनविलेले कार्ड सरेंडर करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शेती व्यवसाय नको रे बाबा; शेतकरी पुत्राची हेलिकॉप्टर व्यवसायासाठी धडपड, केली कोट्यावधींच्या कर्जाची मागणी
“ओंकार तु शेतक-यांना विसरू नकोस हिच माझ्यासाठी गुरु दक्षिणा असेल!"
साखर उत्पादनात भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर; तर 'या' राज्याने मारली बाजी
Share your comments