1. इतर बातम्या

बातमी महत्त्वाची: बाळाच्या हेल्थ आयडीसाठी आता 18 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही! आता नवजात बालकाचा बनणार आयुष्यमान भारत हेल्थ आयडी

तुमच्या घरात एखादा नवजात बालकाने जन्म घेतला असेल ती बातमी तुमच्यासाठी खुप कामाची आहे. आता नवजात बालकाच्या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आयडी साठी आता 18 वर्षे थांबण्याची गरज नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
now will be making ayushman bharat health id to new born baby

now will be making ayushman bharat health id to new born baby

 तुमच्या घरात एखादा नवजात बालकाने जन्म घेतला असेल ती बातमी तुमच्यासाठी खुप कामाची आहे. आता नवजात बालकाच्या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आयडी साठी आता 18 वर्षे थांबण्याची गरज नाही.

आता नवजात बालकाचा देखील हेल्थ आयडी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे बालकाचे पालक स्वतः च्या मुलाचा आरोग्याबद्दल चा एक रेकॉर्ड ट्रॅक करू शकणार आहेत. एवढेच नाही तर मुलाला कुठल्याही डॉक्टर कडे घेऊन जायची वेळ आली तर या आयडी पुढे अनेक प्रकारे मदत होऊ शकणार आहे.

या बाबीवर नॅशनल हेल्थ मिशन काम करीत आहे. हे सगळे मेकॅनिझम  तयार झाले की ही प्रणाली अमलात आणल्या नंतर आई-वडील बालकाचा हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत.

 नवजात बालकाचा हेल्थ आयडी मुळे होणारा फायदा?

 या हेल्थ आयडी मुळे पालकांना त्यांच्या बाळाचा सगळा आरोग्याचे रेकॉर्ड ट्रेक करता येणार असून त्या दृष्टिकोनातून आरोग्यसुविधा बाळाच्या जन्मापासूनच मिळणे शक्य होईल. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या कोणताही प्रकारचा पुरावा नसतो अगदी त्याचे जन्म प्रमाणपत्र  मिळण्यासाठी सुद्धा 30 दिवसांचा कालावधी लागतो

. परंतु आता या हेल्थ आयडी मुळे बाळाचा एक कागदोपत्री  अधिकृत पुरावा देखील असणार आहे. एवढेच नाही तर बाळाच्या आई-वडिलांच्या आयडीशी  या हेल्थ आयडीला लिंक सुद्धा पालकांना करता येणार असल्यामुळे जन्माच्या वेळची बालकांची आरोग्य हिस्ट्री पालकांना पाहता येणार आहे.

त्यामुळे भविष्यकाळात आरोग्यविषयक समस्या व त्यासंबंधीचा वैद्यकीय उपचारांसाठी या माहितीचा खूप फायदा होऊ शकणार आहे.

 कसा बनवला जाणारा हा हेल्थ आयडी?

 यासंबंधी प्रोजेक्टवर नॅशनल हेल्थ मिशन येणाऱ्या काही दिवसात काम सुरू करणार असून या माध्यमातून संबंधित बालकाची आई वडील बाळाचे हेल्थ आयडी तयार करू शकणार आहेत यासाठी आयुष्यमान भारत डिजिटल मिशन वेबसाईट, जे हॉस्पिटल आयुष्यमान भारत योजनेशी निगडित आहेत तिथे, आरोग्य सेतू मोबाईल ॲप, हेल्थकेअर प्रोव्हायडर, पेटीएम ॲप आणि सरकारी आरोग्य योजना यांची मदत घेतली जाणार असून या माध्यमातून नवजात बालकांना फायदा होणार आहे.

 महत्वाच्या बातम्या

 नक्की वाचा:Important Research: कॅल्शियमच्या गोळ्या खातात का? तर सावधान! या गोळ्यांमुळे वयस्करातील हृदयविकाराने 33 टक्के वाढते मृत्यूची शक्यता

नक्की वाचा:रिफाईन्ड, डबल रिफाईन्ड तेल का नको ?स्वयंपाकासाठी रिफाईन्ड, डबल रिफाईन्ड तेल टाळाच

नक्की वाचा:Bike Update:Hero Motocorp ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केली Splendor+XTEC जाणून घ्या या बाईकचे वैशिष्ट्ये

English Summary: now will be making ayushman bharat health id to new born baby Published on: 24 May 2022, 11:15 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters