1. आरोग्य सल्ला

Important Research: कॅल्शियमच्या गोळ्या खातात का? तर सावधान! या गोळ्यांमुळे वयस्करातील हृदयविकाराने 33 टक्के वाढते मृत्यूची शक्यता

शरीरामध्ये असलेल्या कुठल्याही हाडांचे दुखणे राहिले की त्याचे सरळअर्थ हा शरीरामधील कॅल्शियमची कमी हा लावला जातो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
a taking calcium tablet is dangerous for heart in adult person

a taking calcium tablet is dangerous for heart in adult person

 शरीरामध्ये असलेल्या कुठल्याही हाडांचे दुखणे राहिले की त्याचे सरळअर्थ हा शरीरामधील कॅल्शियमची कमी हा लावला जातो.

त्यामुळेकुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करताच बरेच जण कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. परंतु हे कितपत योग्य किंवा सुरक्षित आहे याचा विचार कोणी करत नाही. हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे हे तेवढेच खरे आहे. त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या सर्रासपणे घेतल्या जातात.

परंतु यामध्ये कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटामिन डी लागते. परंतु हे घेतली जात नसल्याची स्थिती धोक्याची ठरू शकते. याबाबत ब्रिटनमध्ये 2650 लोकांवर संशोधन करण्यात आले असून याबाबतचा शोधनिबंध हार्ट मध्ये प्रकाशित झाला आहे. या मध्ये सांगण्यात आले आहे की कॅल्शियमच्या गोळीमुळे वयस्कर लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सामान्यांपेक्षा 33 टक्के वाढतो.

असे अभ्यासातून दिसून आल्या असूनअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर स्वतंत्रपणे कॅल्शियम घेतले तर शरीर या वयात ते शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या महाधमनी ची झापड बंद होऊ शकते. सर्वात धोकादायक म्हणजे यामुळे स्टेनोसिसच्या व्हाल्व्हवर कॅल्शियमचे थर साचतात व त्यामुळे त्याची उघडझाप करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन तसेच त्यातून शरीरातील ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो.

ओहिवोमधील क्लीव्हलँड क्लिनिक फाऊंडेशनच्या संशोधकांनी पाच वर्षे याबाबत अभ्यासकेला. यामध्ये कॅल्शियम सोबत विटामिन डी घेतले नाहीतर हृदयासंबंधी विकारांमुळे मृत्युमुखी  पडण्याची शक्यता दुपटीने वाढते. असा दावा संशोधकांनी केला आहे. अशाच प्रकारचा एक ब्रिटिश मेडिकल जर्नल चा अहवाल 2010 मध्ये जाहीर झाला होता

त्यामध्ये देखील कॅल्शिअम घेणाऱ्यांना हृदयाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते असे नमूद करण्यात आले होते. खरे पाहायला गेले तर शरीरासाठी नैसर्गिक कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे आणि उपयोगी आहे. डेअरी उत्पादने तसेच हिरव्या पालेभाज्या मधूनव माशांचे सेवनाने कॅल्शियम सहज उपलब्ध होते. त्यामुळे नैसर्गिक कॅल्शियम हे गोळ्यापेक्षा कितीही चांगले आहे व तितके आवश्यक देखील आहे.

(टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूहसहमत असेलच असे नाही.)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Baby Corn Cultivation: बेबी कॉर्न म्हणजे नेमके काय? कसे करतात त्याचे लागवड फायदे? जाणून घेऊ सविस्तर

नक्की वाचा:Corona Update: भारतामध्ये 'या' ठिकाणी सापडला Omicron B4 चा पहिला रुग्ण, जाणून घेऊ या स्ट्रेन बद्दल माहिती

नक्की वाचा:अन्नधान्य उत्पादनात वाढ: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 'या' प्रमुख कृषी पिकांच्या उत्पादनाचा आगाऊ अंदाज केला जारी

English Summary: a taking calcium tablet is dangerous for heart in adult person Published on: 23 May 2022, 10:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters