1. ऑटोमोबाईल

Bike Update:Hero Motocorp ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केली Splendor+XTEC जाणून घ्या या बाईकचे वैशिष्ट्ये

अगोदरपासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी वापरतात असे स्प्लेंडर दुचाकी हे सगळ्यांमध्ये आवडती बाईक आहे. सगळ्याच बाबतीत हीलोकांच्या पसंतीस उतरलेलीहोती.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
hero motocorp launch splendor xtec bikes with many new updata version

hero motocorp launch splendor xtec bikes with many new updata version

 अगोदरपासून भारतीयांच्या पसंतीस उतरलेली आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी वापरतात असे स्प्लेंडर दुचाकी हे सगळ्यांमध्ये आवडती बाईक आहे. सगळ्याच बाबतीत हीलोकांच्या पसंतीस उतरलेलीहोती.

आता हीरो मोटोकॉर्प या कंपनीने काही दिवसांपूर्वीच स्प्लेंडर चे नवीन अपडेट वर्जन असलेली splendor+XTEC भारतीय बाजारपेठेमध्ये लॉंच केली आहे. या नवीन लॉन्च केलेल्या बाईक मध्ये अनेक नवीन प्रकारचे आणि अपडेट केलेले फीचर्स कनेक्ट करण्यात आले आहेत

. अगोदर चे अपडेट Pleasure XTEC स्कूटरला देण्यात आले होते तेच या बाईकला देण्यात आले आहेत. या बाईकची एक्स शोरूम किंमत 72 हजार नऊशे पासून सुरू होते. तसेच कंपनीच्या दाव्यानुसार या बाईकला पाच वर्षाची वारंटी देखील मिळेल.या लेखात मध्ये या गाडीच्या आपण काही महत्त्वाचे वैशिष्ट्य जाणून घेऊ.

splendor+ XTEC बाईकचे वैशिष्ट्ये

1- ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी- या स्प्लेंडर च्या नवीन बाईक मध्ये ब्लूटूथ कनेक्ट विटी देण्यात आली असून सोबत सेगमेंट फर्स्ट फुल डिजिटल मीटर सहबाईक येते.यामध्ये डिजिटल डिस्प्ले अगदी उपयोगी व वापरकर्त्याला अनुकूल कार्यासह प्रेझेंट  करण्यात आला आहे.

याद्वारेमोबाईल वर आलेले इन्कमिंग कॉल आणि मिस कॉल अलर्ट,तसेच नवीन एसेमेस सूचना, रियल टाइम मायलेज इंडिकेटर आणि कमी इंधन निर्देशकासह दोन ट्रिप मीटर, तसेच महत्त्वाचे म्हणजे यामध्ये यूएसबी चार्जिंग  दिल्या असून विविध स्कूटरमध्ये कॉमन वैशिष्ट्य आहे परंतु आतापर्यंत बाईकवर नव्हते.त्यामुळे तुम्हाला लांब प्रवास करताना मोबाईल चार्जिंग ची गाडी चालवत असताना सोय होते.

2- एलईडी लाईट- नवीन स्प्लेंडर एलईडी हाय इन्टेन्सिटी पोझिशन लॅम्प आणि विशेष ग्राफिक सोबत येते. तसेच नवीन एलईडी बाईकच्या पुढील भागाचा लूक वाढवतात आणि हे घटक स्प्लेंडर ला स्पोर्टी दिसणारी बाइक बनवण्यात योगदान देतात.

3-i3S तंत्रज्ञान- आयडल स्टॉप स्टार्ट सिस्टम साठी हा हीरो मोटोकॉर्प चा पेटंट शब्द असून या पावर ट्रेनमधून उत्तम इंधन कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी अनुकूल आहे.

ही नवीन स्प्लेंडर 97.2cc BS-VIइंजिन द्वारे येत आहे. जी 7000 rpm वर 7.9 पावर आणि  6000 rpm वर 8.05Nm टॉर्क निर्माण करते. तसेच ही बाईक 4 स्पीड ट्रान्समिशन सोबत येते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:खूप महत्वाची माहिती! पावसाळ्यात शेती परिसरात आढळतात हे सर्वात विषारी साप, जाणून घेऊ या पासुनचा संरक्षित उपाय

नक्की वाचा:Top Tractors 2022: या आहेत भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर, जाणून घेऊन त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत

नक्की वाचा:Tractor Tyres Price:शेतीत वापरल्या जाणाऱ्या छोट्या ट्रॅक्टर साठी उपयोगी आहेत हे टायर, जाणून घ्या त्यांची किंमत

English Summary: hero motocorp launch splendor xtec bikes with many new updata version Published on: 23 May 2022, 10:14 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters