1. इतर बातम्या

अरे वा! आता तुम्ही जितके वाहन वापराल तितकाच येईल विम्याचा खर्च, वाचा सविस्तर नवीन नियम

व्हेईकल इन्शुरन्स अर्थात मोटर विम्याची ही संकल्पना आहे ती सतत विकसित होत असून यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करून विमा क्षेत्राला नव्या पिढीच्या गरजा आणि अपेक्षांची दखल घेण्याइतके सक्षम बनवले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
now new rule of insurence vehicle

now new rule of insurence vehicle

व्हेईकल इन्शुरन्स अर्थात मोटर विम्याची  ही संकल्पना आहे ती सतत विकसित होत असून यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करून विमा क्षेत्राला नव्या पिढीच्या गरजा आणि अपेक्षांची दखल घेण्याइतके सक्षम बनवले आहे.

याच पार्श्वभूमीवर विमा क्षेत्राची नियामक 'इर्डा'ने बुधवारी सामान्य विमा कंपन्यांना मोटार विमा पॉलिसी साठी सुरचित पूरक पॉलिसी आणण्याला परवानगी दिली.

त्यानुसार आता विमा योजनांमध्ये तुमच्या वाहनाचा वापर किंवा वाहन कोणत्या पद्धतीने चालवतात यावर आता विमा हप्त्याचा  दर अवलंबून असणार आहे.

नक्की वाचा:तुमच्यावर खरोखर प्रेम होते, आदित्य ठाकरे बोलताच त्या आमदाराने मानच खाली घातली, आणि...

 हे विमा कवच प्रचलित मूलभूत मोटार विमा पॉलिसी मध्ये पूरक अर्थात एड ऑन  म्हणून प्रदान केले जाईल आणि ते देशातील मोटार विम्याला चालना देण्यास मदतकारक ठरेल असा विश्वास इर्डाने व्यक्त केला आहे.

आता पॉलिसी धारकाच्या वाहनाच्या वापरावर या विम्याचा हप्ता अवलंबून असेल. वाहन वापराच्या आधारित या प्रारूपात द्वारे मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाहन चालल्याचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही मोजली जाते आणि त्यानुसार विमा हप्त्याची गणना होते.

नक्की वाचा:मोठ्या मनाचा शेतकरी!! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे..

 हे आहेत नवीन बदल

1- या माध्यमातून आता जितके वाहन चालवले जाईल आणि वाहन धारकाच्या वाहन चालवण्याच्या वर्तनावर आधारित विम्याचा दर ठरवला जाईल.

सध्या विमा कंपन्यांकडून वाहनाच्या प्रकारानुसार मोटार विम्याचा हप्ता सरसकट सर्व ग्राहकांना एक सारखा आकारला जातो.

2- एकाच व्यक्तीच्या मालकीच्या दुचाकी आणि कार असेल तर अशा ग्राहकाला दोन्ही वाहनांसाठी संयुक्त चल विमापत्र अर्थात फ्लोटर पॉलिसी तुलनेने सवलतीच्या दरात मिळवण्याचे सोय असेल.

क्की वाचा:आणखी एक पाऊल! करा सातबारावरील क्यूआर कोड स्कॅन आणि मिळवा जमिनीची सगळी माहिती, टळेल फसवणूक

English Summary: now new rule of insurence vehicle by irda that get so many benifit Published on: 07 July 2022, 09:12 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters