1. बातम्या

मोठ्या मनाचा शेतकरी!! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे..

काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. असे असताना एक शेतकरी पुत्रच शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडत आहे ज्याचे नाव श्रीकृष्ण थुट्टे असे आहे. चिखली तालुक्यातील भरोसा येथील थुट्टे यांनी शेतकऱ्यांना चांगलाच भरोसा दिला असल्याने आर्थिक संकट टळले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता (Tractor Cultivation) ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे ही मोहिम सुरु केली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे कौतूक केले जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmer son working for farmers, our diesel tractor is yours

Farmer son working for farmers, our diesel tractor is yours

शेतकरी कितीही आर्थिक संकटात असला तरी तो मनाने खूपच श्रीमंत असतो, याची उदाहरणे आपण अनेकदा बघितली आहेत. अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. तसेच बाजारभावाचे गणित देखील त्यांच्या हातात नाही. यामुळे तो संकटात सापडतो. तसेच आतापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे (Kharif Season ) खरीप हंगाम धोक्यात आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यामुळे काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. असे असताना एक शेतकरी पुत्रच शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडत आहे ज्याचे नाव श्रीकृष्ण थुट्टे असे आहे. चिखली तालुक्यातील भरोसा येथील थुट्टे यांनी शेतकऱ्यांना चांगलाच भरोसा दिला असल्याने आर्थिक संकट टळले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता (Tractor Cultivation) ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे ही मोहिम सुरु केली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे कौतूक केले जात आहे.

यामुळे आता मशागतीची कामे आणि ज्यांना दुबार पेरणी करायची आहे त्यांनी केवळ डिझेल टाकून शेती कामे करुन घेता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. यामुळे असा दिलदारपणा फक्त शेतकरीच करू शकतो, अशी चर्चा सध्या सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ तर दिली होतीच पण अल्पशा पावसावर जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ही ठेवलीच होती.

वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..

असे असताना मात्र आता शेतकरी चिंतेत आहेत, पेरणीनंतरही पाऊस हा गायब आहे. तर काही ठिकाणी अधिकच्या पावसामुळे पिकांची उगवण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अधिकच्या पावसामुळे किंवा कमी पावसामुळे हे संकट ओढावले आहे त्यांना मोफत ट्रॅक्टर देऊन मदत केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिला मिळाला आहे.

बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली

यामुळे पुन्हा दुबारसाठी भांडवल कसे उभे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशा गरजू शेतकऱ्यांना का होईना या उपक्रमाची मदत व्हावी म्हणून श्रीकृष्ण थुट्टे यांनी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे ज्याची सबंध चिखली तालुक्यात चर्चा रंगली आहे. यामुळे शेतकरी किती दिलदार असू शकतो, याचे हे चांगलेच उदाहरण आहे.

महत्वाच्या बातम्या;
सोलरमुळे आयुष्यच बदलले, 12 एकर शेती झाली हिरवीगार..
'या' कारने लावले वेड, लॉंच झाल्यापासून हजारोंचे बुकिंग, काय आहेत वैशिष्ट्ये, वाचा...
शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त..

English Summary: Big minded farmer !! Farmer son working for farmers, our diesel tractor is yours .. Published on: 05 July 2022, 10:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters