1. बातम्या

आणखी एक पाऊल! करा सातबारावरील क्यूआर कोड स्कॅन आणि मिळवा जमिनीची सगळी माहिती, टळेल फसवणूक

शेतीसंबंधी राज्यशासन विविध प्रकारच्या योजना आणि पद्धती विकसित करत असून जेणेकरून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता यावे हा त्यामागचा उद्देश आहे. बर्याचदा जमिनीच्या बाबतीत खरेदी-विक्रीमध्ये फसवणूकीचे प्रकार घडतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
will be printing QR code on saatbara

will be printing QR code on saatbara

शेतीसंबंधी राज्यशासन विविध प्रकारच्या योजना आणि पद्धती विकसित करत असून जेणेकरून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता यावे हा त्यामागचा उद्देश आहे. बर्‍याचदा जमिनीच्या बाबतीत खरेदी-विक्रीमध्ये फसवणूकीचे प्रकार घडतात.

आत आपल्याला माहित आहेच की जमिनीची या विषयी सगळी माहिती सातबारा उताऱ्यावर असते. त्यामुळे जमिनीचा आरसा हा सातबारा उतारा असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

या बाबतीत देखील आता शासन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून लवकरच सातबारा उतारा वर क्यूआर कोड देण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार असून आज क्यू आर कोड स्कॅन करताच तुम्हाला संबंधित जमिनीचे किंवा सर्वे नंबर चे सगळे फेरफार उतारे, त्या जमिनीचा नकाशा आणि ती जमीन नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

नक्की वाचा:या' योजनेच्या साथीने शेळीपालन व्यवसाय घेईल उंच उंच भरारी, या योजनेचा घ्या लाभ, फुलवा शेळीपालन व्यवसाय

भूमिअभिलेख विभागाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लगेच सातबारा उताऱ्यावर क्यूआर  कोड दिले जाणार आहेत.

या मागचा शासनाचा उद्देश

 राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नकाशे, जमिनीचे फेरफार आणि सातबारा उतारे  इत्यादी कागदपत्रे कम्प्युटराइज्ड करण्यात येत आहेत.

तसेच जमिनीच्या मोजणी च्या बाबतीत देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे किंवा येणार आहे. या आधुनिक मोजणी पद्धतीमध्ये प्रत्येक सर्वे नंबर चे कोऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे. हे निश्चित केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर क्यू आर कोड प्रिंट करण्यात येईल.

नक्की वाचा:शेतशिवार! आता प्लास्टिक मल्चिंगला करा बाय बाय अन वापरा कोकोपीट मल्चिंग, वाचा सविस्तर

 सातबारा उताऱ्यावर नेमक्या कोणत्या ठिकाणी हा कोड द्यायचा याबाबत शासनाकडून मान्यता घेणे आवश्यक असून त्यासंबंधीचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठवला आहे.

या सातबारा वरील क्यूआर  कोड मुळे आता स्कॅन केल्यानंतर लगेचच जमिनीचे संपूर्ण माहिती  तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार असल्यामुळे जमीन खरेदी विक्रीतील जे काही फसवणुकीचे प्रकार घडतात त्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.

नक्की वाचा:महत्त्वाचा कृषी सल्ला - निंबोळी अर्काचे फायदे आणि बनवण्याची पद्धत

English Summary: maharashtra goverment will be taking decision to print qr code on saatbara utara Published on: 05 July 2022, 09:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters