सध्याच्या काळात देशात मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन व्यवहार केले जातात. यामुळे तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही ऑनलाइन पैसे खर्च करू शकता. असे असताना मात्र एसटी महामंडळात मात्र ही सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे अनेकदा वाद होत होते.
तसेच सुट्टे पैसे देखील नसल्याने गोधळ होत होता. आता मात्र ही कटकट मिटणार आहे. बदलत्या काळात एसटीनेही बदलण्याचा निर्णय घेतला असून, ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.
आता वाहकांना अँड्रॉईड प्रणालीवर आधारित तिकीट मशिन्स देण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशाकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारता येणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशाने दिलेले पैसे थेट महामंडळाकडे जमा होणार आहेत.
साखर करारात मोडतोड, निर्यातदारांनी कारखान्यांकडे केले दुर्लक्ष
दरम्यान, आता प्रवाशांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे आदी ऑनलाइन पेमेंट प्रणालींद्वारे पैसे देऊन तिकीट काढता येईल. त्यामुळे ड्युटी संपल्यावर आगारात कॅशिअरकडे पैसे जमा करून हिशोब देण्याची कटकट संपणार आहे.
पुन्हा शेतकरी मैदानात! देशातील 550 जिल्ह्यांतील शेतकरी दिल्लीत 'गर्जना रॅली' काढून गर्जना करणार
दरम्यान, प्रवासामध्ये तिकिटासाठी अजूनही रोख पैसे द्यावे लागतात. सुट्या पैशांसाठी वाहकासोबत अजूनही वाद घालावा लागतो, अनेकदा हा वाढ वाढतच जातो, यामुळे खोळंबा होतो. यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क
चळवळीचे साक्षीदार ९० वर्षाचे बयाजींची आज साथ सुटली! राजू शेट्टी भावूक
पारवडी येथे ऊस खोडवा पाचट कार्यक्रम संपन्न, शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments