1. सरकारी योजना

मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच

मत्स्यपालकांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाद्वारे ऑनलाइन मार्केटसाठी नवीन 'एक्वा बाजार' अँप लाँच केले आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

मत्स्यपालकांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाद्वारे ऑनलाइन मार्केटसाठी नवीन 'एक्वा बाजार' अँप लाँच केले आहे. या अँप मधून विक्रेत्यांना मासे खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाइन मार्केट मिळणार आहे.

'एक्वा बाजार' चे वैशिष्ट्य

'एक्वा बाजार' अँपवरील ऑनलाइन मार्केट प्लेसच्या मदतीने मत्स्य शेतकरी आणि भागधारकांना जोडले जातील. ज्याद्वारे मत्स्यबीज, खाद्य, औषधे आणि मत्स्यपालनाशी संबंधित इतर संसाधने देखील उपलब्ध असतील.

मत्स्यपालकांसाठी मत्स्यपालन व्यवसाय सुलभ आणि यशस्वी होणे गरजेचे असते. त्यामुळे त्यांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी माहिती आणि सुविधा देणे अत्यंत आवश्यक आहे. हा या अँप चा उद्देश आहे.

शेतकऱ्यांनो पैसा कमवायचा ना? मग मांस उत्पादनासाठी अव्वल ठरणाऱ्या 'या' शेळीचे पालन करा

मत्स्यपालक या अँप वर सामील होऊन संबंधित वस्तूंची यादी करून एक शॉपिंग प्लॅटफॉर्म तयार करू शकतात. मत्स्यबीज, सेवा, नोकर्‍या आणि टेबल फिश, उत्पादन, किंमत, उपलब्ध प्रमाण इ.

महत्वाचे म्हणजे मत्स्यबीज, चारा, खाद्य साहित्य, यासारख्या गोष्टींच्या खरेदीमध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मासेमारीच्या हंगामात ही सर्व संसाधने खूप महाग असतात. हे देखील ही आता अँप वर उपलब्ध होणार आहे.

'या' योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

तुम्हाला हे फायदे मिळतील

एक्वा बाजारच्या मदतीने, मत्स्य शेतकरी आणि भागधारक विक्रेते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधू शकतात.

या प्लॅटफॉर्मवर मत्स्य शेतकरी किंमत ऑफर, उपलब्धता तारीख, टेबलचा आकार आणि मत्स्य बियांची विक्री इत्यादी देखील बनवू किंवा पाहू शकतात. या अँपच्या मदतीने मत्स्य खरेदीदार थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकतील आणि यादरम्यान मत्स्य उत्पादकांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल.

महत्वाच्या बातम्या 
Agricultural Business: शेतकऱ्यांनो 'हे' 3 व्यवसाय शेतीमधून करा; कमी खर्चात मिळेल लाखोंचा नफा
व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...
LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

English Summary: Fishermen buy sell fresh fish online Published on: 21 August 2022, 05:29 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters