छोट्या उद्योजकांचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने मुद्रा लोन योजना राबवत आहे. छोटे व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी अत्यंत उपयोगी असलेली सरकारची मुद्रा लोन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला आहे. छोट्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचे कर्ज या योजनेतून सहज मिळते. दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक (SBI) देशातील छोटे व्यापाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत दहा मिनीटात १० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरवत आहे.
कोरोना सारख्या संकटात एसबीआयकडून मुद्रा लोन स्कीम (Mudra Loan Scheme) च्या मार्फत कर्ज दिले जात असल्याने या काळात छोट्या व्यावसायिकांना खूप फायदा होणार आहे. या योजनेमुळे व्यापारी/ व्यासायिक आपला व्यवसाय वाढवू शकतील. दरम्यान एसबीआयने आपल्या ट्विटर अंकाऊटवरून या योजनेविषयी खूप महत्वाची माहिती दिली आहे. मुद्रा लोन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे उमेदवार घरी बसून मुद्रा लोनसाठी अर्ज करु शकतील आणि मोजून ५९ मिनीटात कर्ज मिळवू शकतील.
हेही वाचा:पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तूर आयातीला लवकर परवानगी
केंद्र सरकारच्या या मुद्रा योजनेतून छोटे- मोटे व्यापारी व्यावसायिक आणि मजुरी करणारे मजूरही सोप्या अटींवर कर्ज मिळवू शकतील. या योजनेच्या माध्यमातून चहा आणि स्नॅक्सचे दुकान सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत दिले जाते. दरम्यान एसबीआयमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जावर ८.५ टक्के व्याज आकारले जाते.
काय आहे मुद्रा योजना:
Micro Units Development and Refinance Agency (MUDRA) पासून निर्मित करण्यात आली आहे. ही मुख्य योजना लहान आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे.
पंतप्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात
कोणताही भारतीय नागरिक मुद्रा लोनसाठी अर्ज करु शकतो. परंतु मुद्रा योजनेसाठी महिला आणि एससी, एसटी उमेदवारांना प्राधन्यता दिले जाते. एसबीआय मार्फत लोन घेण्यासाठी आपल्याकडे ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, बँकेचे स्टेंटमेट, फोटोग्राफ, कोटेशन्स बिझनेज ओळख पत्र, आणि पत्ता इत्यादी कागदपत्रांची गरज असते. यासह जीएसटी आयडेंफिकेशन नंबर, आयकर विभाग रिटर्नची माहिती द्यावी लागते. दरम्यान आपण एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करु शकतात.
Share your comments