1. इतर बातम्या

मुद्रा लोन मिळत नाही का? तर करा 'या' नंबरवर तक्रार

प्रधानमंत्री मुद्रा योजना ( पीएमएमवाय ) ही योजना ८ एप्रिल २०१५ रोजी मोदी सरकारने सुरू केली होती. नॉन - कॉरपोरेट, नॉन - फार्म लघू आणि सुक्ष्म उद्योजकांना या योजनेमार्फत १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. जर आपल्याला आपल्या व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण या योजनेमार्फत कर्ज घेऊ शकतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


प्रधानमंत्री मुद्रा योजना ( पीएमएमवाय ) ही योजना  ८ एप्रिल २०१५ रोजी  मोदी सरकारने सुरू केली होती. नॉन - कॉरपोरेट, नॉन - फार्म लघू आणि सुक्ष्म उद्योजकांना या योजनेमार्फत १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. जर आपल्याला आपल्या व्यवसाय वाढवायचा असेल तर आपण या योजनेमार्फत कर्ज घेऊ शकतो. दरम्यान विविध बँक विविध योजना राबवून मुद्रा योजनेमार्फत कर्ज पुरवत आहेत. भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआय ५९ मिनीटात  १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

दरम्यान, ही योजनेची तीन प्रकार आहेत. शिशु लोन, किशोर लोन और तरुण मुद्रा या प्रकारातून ग्राहक कर्ज घेऊ शकतात. जर आपल्याला व्यवसाय सुरु करायाचा आहे किंवा स्टार्ट- अप उभारायचा असेल तर बँकेमार्फत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

किशोर मुद्रा लोन - या योजनेमार्फत किशोर मुद्रा लोन या गटातून आपण ५० हजारापासून ते ५ लाख रुपयांपर्यंचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी बँक  १४ ते १७ टक्के पर्यंतचे व्याज आकारते. तरुण मुद्रा लोन -  यातून आपण १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. यासाठी बँक १६ टक्के व्याज आकरते.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही मुद्रा लोन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात. https://www.mudra.org.in/  या संकेतस्थळावर जाणून आपण अर्ज करु शकतात. दरम्यान आपल्याला बँकेतून मुद्रा लो योजनेतून कर्ज मिळत नसेल तर टोल फ्री नंबरवर कॉल करुन तक्रार करु शकतात.

नॅशनल  1800 180 1111 आणि 1800 11 0001

महाराष्ट्र:18001022636

 उत्तर प्रदेश: 18001027788

उत्तराखंड: 18001804167

बिहार: 18003456195

छत्तीसगढ़: 18002334358

हरियाणा: 18001802222

हिमाचल प्रदेश:18001802222

झारखंड: 1800 3456 576

राजस्थान: 18001806546

मध्य प्रदेश: 18002334035

मुद्रा लोनसाठी कोणते कागदपत्रे लागतात.  ओळखपत्र,  बँकचे स्टेटमेंट, फोटो, विक्रीचे कागदपत्र, प्राईस कोटेशन्स बिजनेस आयडी, आणि रहिवाशी दाखला,जीएसटी आइडेंटिफिकेशन नंबर, इनकम टॅक्स रिटर्नची माहितीही आपल्याला कागदपत्रासह द्यावी लागेल.

English Summary: Can't get a mudra loan? Complain to this number Published on: 25 August 2020, 12:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters