पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तूर आयातीला लवकर परवानगी

27 March 2021 06:26 PM By: भरत भास्कर जाधव
तूर आयातीमुळे शेतकरी नाराज

तूर आयातीमुळे शेतकरी नाराज

केंद्र सरकार दरवर्षी साधरण एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात कडधान्य आयात कोटा जाहीर करते. मात्र यंदा तूर बाजारात येत असून बरीच शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. परंतु शेतकऱ्यांना विचार न करता पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना खूष करण्यासाठी यंदा १९ मार्चलाच आयात कोटा जाहीर केला.

याचा तुरीच्या दरावर फारसा परिणाम जाणवत नसला तरी या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तूर उत्पादकतेत यंदा मोठ्या  प्रमाणात घट आली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून तुरीचे दर हमीभावाच्या वर होते. देशांतर्गत कमी पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय शेतमालाच्या वाढत्या दराने देशातही दर वाढले आहेत. परिणामी डाळींचे दरही वाढले.त्यातच सध्या पाच राज्यात निवडणुकांची धुमाळी सुरू आहे. त्यामुळे डाळींचे दर कमी करण्यासाठी एरवी एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात जाहीर होणारा आयात कोटा यंदा १९ मार्चलाच जाहीर केला.

 

२०२१-२२ मध्ये कराराप्रमाणे मोझांबिकमधून २ लाख टन आणि व्यापाऱ्यांना ४ लाख टन अशी एकूण ६ लाख टन तूर आयातीला परवानगी दिली. तसेच उडदाची ४ लाख टन आणि मुगाच्या दीड लाख टन आयातीला परवानगी दिली आहे. सध्या बाजारात शेतकरी तूर विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांची बरीच तूर आणखी बाजार येणे बाकी आहे. यातच सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता ग्राहकांना खूष करण्यासाठी लवकर निर्णय घेतल्याने  शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. मुळात यंदा पाऊस, गारपीट आणि बदलत्या वातावरणामुळे उत्पादकतेत मोठी घट आली आहे.

 

आयात कोटा सरकारने लवकर जाहीर केला असला तरी बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसत नाही. मुळात उत्पादन घटीच्या अंदाजाने दर अद्यापही हमीभावाच्या वरच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 'पॅनिक सेल' टाळावा, असे आवाहन  जाणकारांनी केले आहे.

तूर आयात केंद्र सरकार central government tur
English Summary: Elections in five states allow early import of tires

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.