व्यवसाय करताना जर आपण त्यांचे स्वरूप पाहिले तरकाही व्यवसायांना कायम मागणी असते. परंतु काही काही व्यवसाय हे फक्त त्याच्या हंगामानुसार चांगल्या पद्धतीने चालतात व तेवढ्या कालावधीत चांगला पैसा देखील मिळवून देतात.
परंतु गरज असते ती फक्त हंगामानुसार योग्य व्यवसाय निवडीची. हंगामानुसार बरेचसे व्यवसाय असतात की, त्यांच्यामध्ये गुंतवणूक देखील कमीत कमी लागते परंतु हे आर्थिक नफा देखील चांगल्या पद्धतीने देतात.
या लेखामध्ये आपण असाच एका हंगामी व्यवसाय बद्दल माहिती घेणार आहोत. जो पावसाळ्यामध्ये करता येण्याजोगा आणि तेवढ्याच कालावधी चांगला पैसा देऊन जाणारा व्यवसाय आहे.
पावसाळ्यात चालणारा चांगला व्यवसाय
आपल्याला माहित आहेच कि पावसाळ्यामध्ये अगदी खेड्यापाड्यात पासून ते शहरापर्यंत छत्री आणि रेनकोट यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते.
छत्री या पावसाळ्यात सर्वाधिक वापरल्या जातात.पावसाळ्यामध्ये वॉटरप्रूफ स्कूल बॅग, विविध छत्र्या आणि रबर शुज ची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते.
या सगळ्या बाजारपेठेचे विश्लेषण करून तुम्ही हा व्यवसाय या हंगामा पासून सुरु करुनचांगला नफा मिळवू शकतात. या व्यवसायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक म्हणजेच अगदी पाच हजार रुपये गुंतवून व्यवसाय सुरु करु शकतात.
यासाठी व्यवसाय तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात स्थापन करायचा आहे तुम्ही तुमची आर्थिक क्षमता पाहून ठरवू शकतात. पावसाळ्यात रेनकोट, छत्री, मोस्क्यूटोनेट तसेच रबर शूज यांना जास्त प्रमाणात मागणी असते.
या वस्तू तुम्ही घाऊक बाजारातून विकत घेऊ शकता आणि स्थानिक बाजारात विकून चांगला नफा मिळवू शकता. कशात तुम्ही या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून डायरेक्ट खरेदी देखील करू शकता.
वस्तूंच्या उत्पादकांची माहिती तुम्हाला अनेक विध वेबसाईटवर मिळेल. जर यामध्ये शेतकऱ्यांचा विचार केला तर त्या दिवसांमध्ये बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या मिळतात.
यासाठी तुम्हाला छत्री ची किंमत आणि दर्जा या नुसार निवड करून त्या पद्धतीने तुमचा माल विकावा लागेल.
मिळेल चांगले उत्पन्न
तुम्ही रेनकोट,मोस्क्यूटोनेट अगदी तुम्ही तुमच्या घरात बनवू शकतात. तुम्हाला जर शिवणकामाची आवड असेल तर तुम्ही बाजारातून संबंधित वस्तू विकत घेऊन या घरीच तयार करू शकता.
अगदी स्थानिक बाजारात या वस्तूंची विक्री केली तर तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत नफा सहज मिळतो. चांगले व्यवसायात जम बसला तर एका महिन्यात 15 ते 35 हजार रुपये कमाई होऊ शकते.
यासाठी लागणारा माल तुम्ही एखाद्या मोठ्या शहरातील घाऊक बाजारात जाऊन खरेदी करू शकतात व तुमच्या स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रेत्यांना विकू शकतात.
घरी जर तुम्ही छत्री व रेनकोट बनवत असाल तर त्या बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू देखील तुम्हीअशा घाऊक बाजारातून खरेदी करू शकता व या वस्तू घरी देखील बनवून विकू शकतात.
नक्की वाचा:Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित
Share your comments