1. कृषी व्यवसाय

Profitable Bussiness!कमी जागेत,कमी गुंतवणुकीत मिळवा जास्त नफा, सुरु करा हा व्यवसाय अन मिळवा चांगला नफा

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
making insence stick business give more profit in low investment

making insence stick business give more profit in low investment

 सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी असे असंख्य छोटे छोटे आणि कमी गुंतवणुकीतून सुरू करता येणारे खूप व्यवसाय आहेत. परंतु त्या व्यवसायाची काटेकोर माहिती असणे तितकेच गरजेचे असते. बऱ्याच वस्तू आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण वापरतो.

त्यातल्या बर्‍याच वस्तू तयार करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नसते. जर अशाच कमी गुंतवणुकीतुन उत्तम नफा देणारे व्यवसायाची निवड केली तर नक्कीच आर्थिक समस्या कमी होऊ शकते.  या लेखात आपण अशाच छोट्याशा व्यवसायाची माहिती घेणार आहोत, जो कमी गुंतवणुकीतून चांगला नफा देण्याची क्षमता ठेवतो.

 कमी गुंतवणुकीतून सुरु करा हा व्यवसाय

 आपल्याला माहिती आहे की अगरबत्ती ही सर्वसामान्यपणे प्रत्येक घरात वापरले जाते.त्यामुळे अगरबत्ती व्यवसायाला खूप मोठी बाजारपेठेत मागणी आहे.तसेच भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात वाशा जवळपास प्रत्येक धर्मातील लोक अगरबत्ती धार्मिक कार्यामध्ये वापरतात. यामध्ये प्रत्येकाची आवड ही वेगळी असते.

नक्की वाचा:अगदी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हँडवॉश व्यवसाय सुरू करा अन मिळवा प्रतिमहिना 25 ते 30 हजार

 अगरबत्ती चा सुवास, तिचा आकार अशा पातळ्यांवर विविध प्रकारच्या अगरबत्त्या तयार करता येणे शक्य आहे. आणि हा व्यवसाय साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या नवीन सेट अप आणि जागेची आवश्यकता नसून हा व्यवसाय तुम्ही अगदी तुमच्या घरात बसून सुरुवात करू शकतात.

नाही यंत्रसामग्रीची गरज न भासता अगदी जुजबी ज्ञान तुम्हाला असले तरी भरपूर झाले. अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि त्याचे योग्य ते प्रमाण याचेव्यवस्थित अभ्यास आणि माहिती असणे गरजेचे आहे.अगदी कमीत कमी भांडवलात हा व्यवसाय करता येतो.

सुरुवातीला तूम्ही तयार केलेली अगरबत्ती विकण्यासाठी आपल्याला माहितीतल्या, शेजारी, नातेवाईक इत्यादी पासून सुरुवात करावी.  तुमचे उत्पादन दर्जेदार असेल तर त्याची मौखिक प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात होते व आपोआप ग्राहक जोडला जातो.

या व्यवसायात हळूहळू वाढ करणे गरजेचे असते.जरा अगरबत्ती व्यवसाय असा एकंदरीत भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर बारा ते पंधरा कोटींच्या आसपास अगरबत्तीचा व्यवसाय होतो.एवढेच नाही तर भारतीय अगरबत्ती अनेक देशांना निर्यात देखील केली जाते.

नक्की वाचा:Low Investment bussiness: कमी खर्चात करा हा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

 अगरबत्ती बनवण्याच्या विविध पद्धती असून यामध्ये वेळूच्या काड्यांना सुगंधी बुक्का लावून अगरबत्ती बनवता येते, तर सुगंधित अगरबत्ती बनवण्यासाठी बाजारात कच्चा माल तयार देखील मिळतो. त्याचा वापर करून तुम्ही अगरबत्ती बनवू शकतात.

अगरबत्ती बनवताना अगरबत्तीचा मसाला कांडीला व्यवस्थित लावल्यावर ती कांडी सुगंधी द्रव्यात बुडवून वाळविली जाते.परंतु अगरबत्ती सावलीतच वाळवावी लागते.अगरबत्ती या चंदन, केवडा,मोगरा,गुलाब वातावरण शुद्धीसाठी अशा विविध स्वरूपात अगरबत्त्या बनवल्या जातात.

च्या स्वरुपात तुम्हाला अगरबत्ती बनवायची आहे त्यापेक्षा दीड ते दोन इंच लांब कांडी घ्यावी.अगरबत्ती वर लावण्यात येणाऱ्या मसाल्याच्या प्रमाणानुसार अगरबत्ती ची एकूण संख्या ठरते.एका किलोमध्ये सरासरी 1350 ते 1440अगरबत्ती च्या काड्या बनतात.

एक कांड्या तयार झाल्यानंतर त्यांची व्यवस्थित पॅकिंग करते मात्र गरजेचे असते.आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी उत्पादनाला ब्रँडनेम देणेही गरजेचे आहे.तसेच त्यांचे पॅकिंग ही आकर्षक असावी.त्यामुळे बाजारपेठेत प्रतिस्पर्धी माला बरोबर आपला माल टिकण्यास मदत होते.

नक्की वाचा:शेतीसाठी बहुउद्देशीय सौर उर्जेवर चालणारे '-प्राईम मूव्हर' मशीन शेतकऱ्यांचा खर्च करेल शून्य,वाचा माहिती

English Summary: making insence stick business give more profit in low investment Published on: 19 June 2022, 02:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters