लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी हे विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून सगळ्यांना माहीत असलेली व विश्वासदायक कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे विमा योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा हप्त्यामध्ये विमा संरक्षण देते. परंतु बऱ्याचदा असे होते की, आपण घेतलेल्या पॉलिसीचे प्रीमियम अर्थात हप्ते काही आर्थिक अडचणीमुळे भरता येत नाहीत व आपण घेतलेली पॉलिसी लॅप्स अर्थात खंडित होते व पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचे नुकसान होते.
परंतु आता जर कोणाला अशी समस्या आली असेल तर त्यांना एल आय सी ने पुन्हा एकदा संधी दिली असून एल आय सी ने आणलेल्या डिस्काउंट ऑफर च्या माध्यमातून तुमची बंद पडलेली पॉलिसी तुम्हाला सुरू करता येऊ शकते. यासंबंधीचे काही नियम असून त्या बद्दल आपण माहिती घेऊ.
या ऑफर विषयी माहिती
एलआयसीने अलीकडेच एका निवेदनाच्या माध्यमातून जारी केले आहे की, युलिप योजना वगळता सर्व एलआयसी पॉलिसी लेट फी अर्थात विलंब शुल्कावर पॉलीसी धारकांना विशेष सवलती सोबतच तुमची बंद पडलेली पॉलिसी सुरू करता येऊ शकते.
ही ऑफर एलआयसीने 17 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून 21 ऑक्टोबर 2022 या तारखेपर्यंत सुरू असणार आहे. विलंब शुल्कावर या माध्यमातून शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. परंतु या प्रकारच्या माध्यमातून एलआयसी पॉलिसी धारकांना सूक्ष्म विमा पॉलिसीवर शंभर टक्के सूट देणार आहे.
या अंतर्गत यूलीप योजने व्यतिरिक्त बंद पडलेल्या सर्व प्रकारचे पॉलिसांना पुन्हा सुरू करण्याची संधी दिली आहे. यामध्ये एक नियम असून तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचा प्रिमियम किमान पाच वर्षांपूर्वी जमा करण्यात आलेला असेल तीच पुन्हा सुरू करता येणार आहे.
नक्की वाचा:पीक विम्यासाठी सरकारकडून 19 कोटी 69 लाख रुपयांचा निधी; शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे डिस्काउंट ऑफर?
यामध्ये पॉलिसीधारकांना एक डिस्काउंट ऑफर दिली जात असून समजा तुमची पॉलिसी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला विलंब शुल्कात 25 टक्के सूट दिली जाणार आहे.
म्हणजे तुम्हाला यामध्ये एक लाख रुपयेच्या मागे दोन हजार पाचशे रुपये सूट मिळेल. तुमची पॉलिसी एक ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर सवलत रक्कम तीन हजार रुपयापर्यंत निश्चित करण्यात आले आहे आणि जर तीन लाखाच्या पुढे तुमची पॉलिसी असेल तर तीन हजार 500 रुपये पर्यंत सुट मिळेल.
Share your comments