1. सरकारी योजना

मोदी सरकारच्या 'या' योजनेत पती-पत्नी दोघांना प्रतिमहा मिळतात 'इतके' रुपये, वाचा या योजनेविषयी महत्त्वाची माहिती

आयुष्यभर काबाडकष्ट करून व्यक्ती पैशांची बचत करतात. त्यातील बराचसा भाग कुटुंबावर, मुलांचे शिक्षण, लग्न असे अनेक प्रकारच्या कौटुंबिक आरोग्याच्या समस्या, लागणारे आवश्यक गोष्टी इत्यादींवर खर्च केले जातात व या माध्यमातून उरणारा पैसा हा भविष्यकालीन आर्थिक तरतूद म्हणून बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.परंतु आपण गुंतवणूक करत असलेले पैसे हे खरोखरच भविष्यकाळात आपल्याला कितपत उपयोगी पडतील किंवा त्याचा परतावा आपल्याला किती येईल हेदेखील पाहणे एवढेच महत्त्वाचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pradhanmantri vay vandana yojana

pradhanmantri vay vandana yojana

आयुष्यभर काबाडकष्ट करून व्यक्ती पैशांची बचत करतात. त्यातील बराचसा भाग कुटुंबावर, मुलांचे शिक्षण, लग्न असे अनेक प्रकारच्या कौटुंबिक आरोग्याच्या समस्या, लागणारे आवश्यक गोष्टी इत्यादींवर खर्च केले जातात व या माध्यमातून उरणारा पैसा हा भविष्यकालीन आर्थिक तरतूद म्हणून बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.परंतु आपण गुंतवणूक करत असलेले पैसे हे खरोखरच भविष्यकाळात आपल्याला कितपत उपयोगी पडतील किंवा त्याचा परतावा आपल्याला किती येईल हेदेखील पाहणे एवढेच महत्त्वाचे असते.

बऱ्याच व्यक्ती हे  निवृत्तीनंतर आयुष्य सुकर जावे यासाठी पैसे गुंतवतात. यासाठी वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत परंतु केंद्र सरकारची प्रधानमंत्री वय वंदना योजना ही अशीच एक उपयुक्त योजना असून तुम्ही केलेली गुंतवणूक की यामध्ये सुरक्षित तर होतेच परंतु या माध्यमातून मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.

नक्की वाचा:EPFO: सरकारकडून PF खातेधारकांना मोफत 7 लाख रुपये; असा घ्या लाभ...

 प्रधानमंत्री वय वंदना योजना

 केंद्र सरकारने 4 मे 2017 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे सुरक्षितता लक्षात घेऊन ही योजना सुरू केली होती. ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जाते. अगोदर या योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा ही साडेसात लाख रुपये होती परंतु आता ती 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

या योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांवर वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये पती-पत्नी दोघं मिळून देखील गुंतवणूक करू शकता. समजा पती आणि पत्नी दोघांनी मिळून वयाच्या 60 व्या वर्षी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांना प्रतिमहा अठरा हजार तीनशे रुपये पेन्शन मिळते.

नक्की वाचा:Village Business Idea: शेतकरी पुत्रांनो 1 लाख गुंतवुन गावातचं सुरु करा 'हा' व्यवसाय, महिन्याला 40 लाखापर्यंत कमाई होणारं

 या योजनेत एकंदरीत गुंतवणुकीचे स्वरूप

यामध्ये गुंतवणूक किती केली आहे यानुसार प्रतिमहा एक हजार रुपये ते नऊ हजार 250 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. समजा तुम्ही किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला दरमहा एक हजार रुपयाची पेन्शन मिळेल व 15 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर प्रतिमाह नऊ हजार 250 रुपये पेन्शन दिली जाते.

या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक वर्ष, सहा महिने, तीन महिने आणि दर महिने याप्रमाणे पेन्शन मिळू शकते. हे तुम्ही योजना कोणती घेतली आहे यावर अवलंबून असते. योजना दहा वर्षांसाठी असून या दरम्यान जर पॉलिसीधारकाला मृत्यू झाल्यास नॉमिनीला यामधील मूळ रक्कम दिली जाते.

नक्की वाचा:Gold Rate Update: सोने चांदीच्या दरात वाढ, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 700 रुपयांची वाढ, वाचा भाव

English Summary: pradhanmantri vay vandana yojana is important for after retirement life Published on: 19 August 2022, 07:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters