अनेकदा प्रवास करत असताना अनेक अडचणी येतात. वाहतुकीचे नियम अनेकांना माहित नसल्याने अनेकदा अडचणी येतात. असे असताना आता वाहतूक पोलिस विनाकारण वाहन चालकांना थांबवू शकणार नाहीत, तसेच कारण नसताना गाडीची तपासणीही करू शकत नाहीत. यासाठी आदेशही जारी करण्यात आला आहे. यामुळे आता प्रवास करताना अडचणी येणार नाहीत. असे वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
याबाबत पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी वाहतूक शाखेला परिपत्रक जारी केले आहे. वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करणार नाहीत. तसेच जिथे तपासणी नाके आहेत. ते केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील आणि वाहतूक सामान्यपणे सुरू राहिल याकडे लक्ष केंद्रित करतील. ते एखादे वाहन तेव्हाच थांबवू शकतील, जेव्हा वाहतुकीच्या वेगावर त्याचा परिणाम होत असेल, असा नवीन नियम आहे.
तसेच आता वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंड आकारला जाऊ शकतो, असे या परिपत्रकात म्हटले आहे. अनेकदा वाहतूक पोलिस संशयाच्या आधारावर वाहने रोखतात आणि तपासणी करतात त्यामुळे महामार्गावरअनेकदा अडचणी येतात. तसेच प्रवास करताना जास्तीचा वेळही वाया जातो.
बचत गटातील महिलांनी करून दाखवले! शेतकरी महिला गटाचा तांदूळ, आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद
रस्त्यांवरील वर्दळ वाढत असल्याने वाहतूक पोलिसांना वाहनांची तपासणी बंद करण्यास सांगितले असून, वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्यासही सांगण्यात आले आहे. यामुळे आता जास्त वेळ जाणार नाही. तसेच या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरीक्षक जबाबदार असतील. असेही सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
लिलावाविना फळे बाजार समितीमध्येच पडून, खरेदीला गेलं की ५० ला एक, कसा घालायचा मेळ
कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा
7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..
Share your comments