1. इतर बातम्या

सावधान: वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे पडेल आता महाग, जाणून घेऊन नवीन नियमाबद्दल

महाराष्ट्र सरकारने मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहन चालकाच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
traffic police

traffic police

महाराष्ट्र सरकारने मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहन चालकाच्या खिशाला आता चांगलाच फटका बसणार आहे.

शासनाच्या या सुधारित नियमानुसार  ईचलन प्रणालीमध्ये दंडाच्या रकमेबाबत 11 डिसेंबर च्या मध्यरात्रीपासून बदल करण्यात येणार आहेत. या नवीन नियमानुसार जर  बाइक चालवताना मोबाईलवर बोलल्यास  200 रुपये तब्बल एक हजार रुपयांचा दंडभरावा लागणार आहे.

 सरकारने याबाबत नवीन परिपत्रक जारी केले असून, मोटार वाहन कायदा 2019 च्या तरतुदी राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 1 डिसेंबर पासून राज्यात नवीन अधिनियम लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु वाहतूक पोलिसांच्या दंडवसुलीच्या e-challan प्रणालीमध्ये प्रत्यक्षात 11डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन बदल करण्यात येणार आहेत.त्यामुळे आता वाहन चालकांना एका शिस्तीत वाहन चालवावे लागणार असून नियम मोडला तर  शंभर पट दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे..

मोटार वाहन कायदा( दुरुस्ती ) केंद्राने 1 सप्टेंबर 2019 पासून लागू केला असून त्याच्यातील काही कलमांतर्गतआकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये बदल करीत त्यानुसार दंडाच्या रकमेमध्ये बदल केला आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोटार वाहन कायद्यातील दंड प्रमाणापेक्षा जास्त असल्याने तो जसाच्या तसा लागू करण्यास विरोध दर्शवला होता.

 असे असतील नवीन दंड

  • विनाकारण हॉर्न वाजवला पहिल्यांदा पाचशे रुपये दंड आणि दुसऱ्यावेळी एकहजार पाचशे रुपये दंडअसेल.
  • विना हेल्मेट पहिल्यांदा 500 रुपये आणि दुसऱ्या अपराधास 1500 रुपये दंड असेल.
  • वाहन वेगाने चालवल्यास दुचाकी  किंवा तीन चाकी वाहनास हजार रुपये ट्रॅक्टर या वाहनास एक हजार पाचशे रुपये हलक्या वाहनास चार हजार रुपये दंड असेल.
  • वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास प्रथम  गुन्ह्यास  एक हजार रुपये, तीन चाकी ला दोन हजार रुपये, जड वाहनास चार हजार रुपये आणि दुसऱ्या अपराधास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

( संदर्भ- सामना)

English Summary: when you ride bike then you speak on mobile recover find from you Published on: 14 December 2021, 10:19 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters