आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांची पैकी एक कागदपत्र आहे. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा अन्य कामांसाठी कागदपत्रांच्या यादीत आधार कार्ड प्रथम स्थानी असते. इतके आधार कार्ड आता महत्त्वाचे आहे.
परंतु आधार कार्ड जितके महत्त्वाचे आहे तेवढेच त्याची सुरक्षा करणे देखील एक आपली जबाबदारी आणि अत्यावश्यक अशी बाब आहे. सध्या आपण बऱ्याच घटनांवरून पाहतो की आधार कार्डचा गैरवापर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
त्यामुळे आपले आधार कार्ड कोणत्या ठिकाणी वापरले जात आहे का? याची माहिती आपल्याला असणे हे देखील गरजेचे आहे. परंतु आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी ही माहिती कुठे आणि कशी मिळेल? तर या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात घेणार आहोत.
ही पद्धत तुम्हाला उपयोगी ठरेल तुमच्या आधार कार्डच्या वापरासंबंधी माहितीसाठी
भारतातील आधार कार्डचे काम पाहणारी जी संस्था आहे तिचे नाव यूआयडीएआय आहे आपल्याला माहिती आहे. या संस्थेने तुमचे आधार कार्ड कोठे कोठे वापरली जात आहे हे पाहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे
यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण हिस्ट्री टूल मिळेल. याच्या साह्याने तुम्ही तुमच्या आधार कार्डची डिटेल्स चेक करू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे अगदी अचूक कळू शकते.
अशा पद्धतीने तपासा
1- सर्वप्रथम तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://uidai.gov.in वर जावे लागेल.
2- नंतर माय आधार या टॅबमध्ये तुम्हाला आधार सेवा हाय पर्याय असतो. त्या ठिकाणी आधार अथेंटिकेशन हिस्टरी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3- या ठिकाणी गेल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होते. याठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
4- आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा. त्यानंतर जनरेटर ओटीपी बटणावर क्लिक केल्यानंतर दुसरे पेज उघडते.
5- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चे सगळे मागील वापराचा तपशील पाण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
6- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो नोंदवावा.
7- त्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आधार कार्ड वापरले गेले त्याच्या तारीख, वेळ आणि वापराचे प्रकार तुम्हाला कळतील. या सुविधेमार्फत तुम्ही एका वेळी पन्नास व्यवहारांचे डिटेल्स माहिती करून घेऊ शकता.
8- हे सगळे डिटेल्स पाहिल्यानंतर तुम्हाला कळून येते की, तुम्ही ते स्वतः केले आहेत की काही संशयास्पद कृती घडली आहे हे तुम्हाला लगेच कळते.
Share your comments