Gold Price Update: रशिया आणि युक्रेन युद्धापासून देशात महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या (Silver) किमतींमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात सोने (Gold) आणि चांदीच्या किमतींमध्ये दररोज बदल पाहायला मिळत आहेत. तुम्हीही दिवाळीमध्ये सोने आणि चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हीच संधी आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्यानंतर आता स्थिरता आली आहे. या सणासुदीचा हंगाम ग्राहकांना खरेदीसाठी उत्तम संधी आहे. सराफा बाजारात (Bullion Market) आज 22 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 46,760 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत 51,010 रुपये आहे. दुसरीकडे, चांदीचा प्रति किलो सरासरी भाव 57,170 रुपयांवर आला आहे.
प्रमुख शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम किंमत
चेन्नई: रु 47,610 (22 कॅरेट), 51,940 (24 कॅरेट)
मुंबई : 46,760 (22 कॅरेट), 51,010 (24 कॅरेट)
दिल्ली : 46,910(२२ कॅरेट), 51,160 (24 कॅरेट)
कोलकाता : 46,760 (22 कॅरेट), 51,010 (24 कॅरेट)
जयपूर : 46,910 (22 कॅरेट), 51,160 (24 कॅरेट)
लखनौ : 46,910 (22 कॅरेट), 51,160 (24 कॅरेट)
पाटणा : 46,770 (22 कॅरेट), 51,020 (24 कॅरेट)
सुरत : 46,810 (22 कॅरेट), 51,060 (24 कॅरेट)
परतीच्या पावसाचे राज्यात थैमान! सोयाबीनसह, मूग, उडीद पिकं पाण्याखाली; शेतकरी अडचणीत
14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीनतम किंमत
अशाप्रकारे गुरुवारी 24 कॅरेट सोने 114 रुपयांनी महागून 50869 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 112 रुपयांनी महागून 50665 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 104 रुपयांनी महागून 46596 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 86 रुपयांनी महागून 38152 रुपये झाले आहे. आणि 14 कॅरेट सोने 66 रुपयांनी महागून 29758 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोने 5300 आणि चांदी 22800 स्वस्त होत आहे
सोने सध्या 5331 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 228946 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
हिवाळ्यात टोमॅटोच्या शेतीपासून मिळेल बक्कळ पैसा; करा या अस्सल जातींची लागवड
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस (BIS) केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.
महत्वाच्या बातम्या:
आता पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार? भारतीय किसान संघ काढणार रॅली
सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! आजच UPSC च्या या भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर...
Share your comments