Gold Price Update: गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार कायम आहे. तुमही सोने किंवा चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण सोने आणि चांदी त्याच्या उच्चांक दरापासून स्वस्त मिळत आहे. मात्र या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे.
सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 473 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदी 748 रुपयांनी महागली आहे. यानंतर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52000 रुपये आणि चांदी 58000 रुपये किलोच्या आसपास आहे. त्यामुळे सोने 4100 रुपयांनी तर चांदी 22000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
सोने 4100 आणि चांदी 21900 उच्चांक दरापासून स्वस्त
या वाढीनंतरही, सोन्याचा भाव सध्या 4161 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 21923 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
नोकरीला करा रामराम आणि सुरु करा हा सुपरहिट बिझनेस; कराल लाखोंची कमाई
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या किंमत
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही वारंवार होणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत वाढ
गेल्या 161 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील सराफा बाजारात (Bullion Market) अस्थिरतेची स्थिती आहे. अशा स्थितीत जगभरात सोन्या-चांदीच्या दरात चढाओढ सुरू आहे.
शेतकरी कमावणार आता बक्कळ पैसा! फक्त करा या औषधी वनस्पतींची लागवड आणि व्हा मालामाल
जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी ते दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! खाद्यतेलाच्या किमतीत होऊ शकते इतक्या रुपयांनी घट; जाणून घ्या...
भारीच की ! 25 पैशांच्या नाण्यांच्या बदल्यात मिळतायेत 40 हजार; असा घ्या लाभ...
Share your comments