1. इतर बातम्या

पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर! जाणून घ्या स्वस्त झाले की महाग

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. हे दर काही खाली येताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक हाल होत आहेत. तसेच घरगुती गॅसच्याही किमती वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

petrol diesel

petrol diesel

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. हे दर काही खाली येताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक हाल होत आहेत. तसेच घरगुती गॅसच्याही किमती वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) गुरुवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. अशाप्रकारे आज सलग ७६ वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवार, 4 ऑगस्ट साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सलग ७६व्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! सणासुदीच्या काळात खाद्यतेल होणार इतक्या रुपयांनी स्वस्त

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.

सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

केळी उत्पादकांनो सावधान! बंची टॉप विषाणूचा होतोय प्रादुर्भाव; करा हा उपाय अन्यथा होईल मोठे नुकसान

मोठ्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०६ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल १०३.१९ रुपये आणि डिझेल ९४.७६ रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर.
नोएडा : पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: ९७.१८ रुपये आणि डिझेल ९०.०५ रुपये प्रति लिटर.

त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

महत्वाच्या बातम्या:
पुढील ३ दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट
PM Kisan: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! 12व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळणार 4000 रुपये; जाणून घ्या कसे

English Summary: The latest price of petrol diesel announced! Published on: 04 August 2022, 09:19 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters