1. कृषी व्यवसाय

नोकरीला करा रामराम आणि सुरु करा हा सुपरहिट बिझनेस; कराल लाखोंची कमाई

Business Idea: कोरोना काळात अनेक तरुण शेती क्षेत्राकडे वळले आहेत. हे तरुण शेतकरी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तसेच पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. यातून त्यांना चांगला नफा शिल्लक राहत आहे. तसेच शेती करत करत शेतीसंबंधित व्यवसाय करून बक्कळ नफा कमवत आहेत.

business idea

business idea

Business Idea: कोरोना काळात अनेक तरुण शेती (Farming) क्षेत्राकडे वळले आहेत. हे तरुण शेतकरी (Farmers) शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तसेच पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत आहेत. यातून त्यांना चांगला नफा शिल्लक राहत आहे. तसेच शेती करत करत शेतीसंबंधित व्यवसाय (Agricultural business) करून बक्कळ नफा कमवत आहेत.

तुम्हालाही शेतीतून चांगले पैसे मिळवायचे असतील तर आज तुम्हाला अशा उत्पादनाचे नाव सांगणार आहोत. ज्याला वर्षभर मागणी राहते. तुम्हाला जीरा शेतीबद्दल (Cumin cultivation) सांगत आहोत. भारतातील सर्व स्वयंपाकघरांमध्ये जिरे सामान्यतः आढळतात. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. त्यामुळे त्याची मागणी दुप्पट होते.

जिऱ्याच्या चांगल्या जाती

जिरे लागवडीसाठी हलकी आणि चिकणमाती जमीन चांगली मानली जाते. अशा जमिनीत जिऱ्याची लागवड सहज करता येते. पेरणीपूर्वी शेताची तयारी योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. ज्या शेतात जिरे पेरायचे आहेत ते शेतातील तण काढून स्वच्छ करावे.

पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर! जाणून घ्या स्वस्त झाले की महाग

जिऱ्याच्या चांगल्या वाणांमध्ये तीन जातींची नावे प्रमुख आहेत. RZ 19 आणि 209, RZ 223 आणि GC 1-2-3 हे वाण चांगले मानले जातात. या जातींचे बियाणे १२०-१२५ दिवसांत परिपक्व होतात. या जातींचे सरासरी उत्पादन 510 ते 530 किलो प्रति हेक्टर आहे. त्यामुळे या वाणांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळू शकते.

जिरे पासून कमाई

आनंदवार्ता! सणासुदीच्या मुहूर्तावर सोने 4700 आणि चांदी 22000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...

देशातील 80 टक्क्यांहून अधिक जिरे गुजरात आणि राजस्थानमध्ये घेतले जातात. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 28 टक्के जिऱ्याचे उत्पादन राजस्थानमध्ये होते. आता उत्पन्नाविषयी बोलायचे तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत जिऱ्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी ७-८ क्विंटल बियाणे होते.

जिऱ्याच्या लागवडीवर हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये खर्च येतो. जिऱ्याची किंमत 100 रुपये प्रतिकिलो धरल्यास हेक्टरी 40000 ते 45000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. अशा परिस्थितीत 5 एकर लागवडीत जिरे घेतल्यास 2 ते 2.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या:
शेतकरी बनणार लखपती! हे पीक करणार मालामाल; जाणून घ्या सविस्तर...
ही शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल! बाजारातही असते सतत मागणी; होईल बंपर कमाई

English Summary: start this superhit business; Earn millions Published on: 04 August 2022, 11:51 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters