जिओनी एक खास ऑफर आणली असून या ऑफर नुसार तुमच्याकडे कोणताही जुना 4 जी फोन असेल तर तुम्ही त्या फोनच्या बदल्यातजिओ फोन नेक्स्ट वर 2000 सूट मिळवू शकतात.
यासंबंधी रिलायन्स रिटेलने मर्यादित काळासाठी जिओ फोन नेक्स्ट एक्सचेंज टू अपग्रेड ऑफर लॉन्च केली आहे. या फोनची किंमत 6,499 रूपयांपासूनचे डिस्काउंट नंतर 4499 पर्यंत कमी होईल. जिओ फोन नेक्स्ट हा फोन बनवण्यासाठी रिलायन्स जिओ आणि गुगलने एकत्रित संशोधनाचे काम केले आहे.
कशी आहे ऑफर?
या फर्मच्या माध्यमातून तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4जी फिचर फोन किंवा स्मार्टफोन असेल तर तो दिला जाऊ शकतो. जुना जिओ फोन देऊन ग्राहकांना दोन हजार रुपयांची सूट देखील मिळू शकते. तुमच्याकडे जुना 4जी फिचर फोन असेल तरीही तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.या ऑफरचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील जिओ मार्ट आणि रीलायन्स डिजिटल स्टॉअरला भेट देऊ शकता.
यासाठी तुम्हाला फोरजी फोन द्यावा लागेल व तुम्हाला 6599 रुपयांचा जिओ फोन नेक्स्ट 4499 रुपयांमध्ये मिळेल.
जिओ फोनची वैशिष्ट्ये
5.45इंच एचडी स्क्रीन,कॉर्णींग गोरिल्ला ग्लास,जिओ आणि गुगल पिलोडेड ॲप्स, प्रगती ऑपरेटिंग सिस्टम, ड्युअल सिम, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स, अँटी फिंगरप्रिंट कोटिंग, 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा,3500 mAh बॅटरी, प्रोसेसर स्नेप ड्रेगन QM 215, 2 जीबी रॅम, बत्तीस जीबी इंटरनल मेमरी,
512 जीबीपर्यंत एक्सपांडडेबलमेमरी, ब्लूटूथ, वाय फाय, हॉट स्पॉट, ओटीजी सपोर्ट, जी सेन्सर, लाईट सेंसर आणि प्रॉक्सीमिटी सेंसर उपलब्ध असतील.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ही' जिल्हा बँक देत आहे नागरिकांना या जबरदस्त कर्ज योजना, या लोकांना मिळू शकतो भरपूर फायदा
नक्की वाचा:या'सरकारने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय पण महाराष्ट्र सरकार घेईल का?
नक्की वाचा:महत्त्वाचा शासन निर्णय! दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन
Share your comments