1. इतर बातम्या

Gold Rate Update: सोने घ्यायचे तर आत्ताच घ्या नाहीतर वाढतील भाव!सोन्याच्या आयात शुल्कात वाढ

केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण यावे यासाठी आयातशुल्क 10.25 टक्क्यांवरून 4.25 टक्क्यांची वाढ करत 15 टक्के आता केले आहे. त्यामुळे आता सोन्याच्या आयातीवर सर्व शुल्कासह एकूण कर वाढून 18.45 टक्के का वाढला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment growth in exice duty on export of gold

central goverment growth in exice duty on export of gold

केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण यावे यासाठी आयातशुल्क 10.25 टक्क्यांवरून 4.25 टक्क्यांची वाढ करत 15 टक्के आता केले आहे. त्यामुळे आता सोन्याच्या आयातीवर सर्व शुल्कासह एकूण कर वाढून 18.45 टक्के का वाढला आहे.

आता हे नवे दर 30 जून पासून लागू होणार असून जगामध्ये चीन हा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

 भारताची सोन्याच्या आयातीची स्थिती

 चालू वर्षाच्या मे महिन्यात सोन्याच्या आयात 107 टन इतकी होती. जून मध्ये देखील एकूण आयात जास्त होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे  देशाच्या चालू खात्यातील तुटीमध्ये भर पडत होती.कच्चा तेल यानंतर सोने आयातीत भारत सर्वाधिक खर्च करतो.

सोन्यावरील आयात शुल्क वाढवले यामुळे सोन्याची मागणी घटेल असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट कमी होईल व डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असलेल्या रुपयाचे स्थिती देखील सुधारण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते जेवढ्या आयात शुल्क वाढवले जाईल तेवढ्या प्रमाणात सोन्याच्या किमती देखील वाढतील.

नक्की वाचा:इथेनॉलनिर्मिती प्रक्रियेत गु-हाळघरांचा समावेश करा; राजू शेट्टी यांची मागणी

या निर्णयाचा किमतींवर  लगेच परिणाम               

 सोन्यावरील आयात शुल्क वाढणार हे बातमी शुक्रवारी बाजार उघडण्याच्या आधीच समजल्याने किमतींवर परिणाम झाला.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार  शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोने 986 रुपयांच्या भरारीसह 51849 रुपयांवर पोहोचले तर सायंकाळी 928 रुपयांच्या वाढीसोबत 51 हजार 791 रुपये मोजावे लागले.

नक्की वाचा:कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; 'या' देशाने भारतीय कांदा आयत करण्यासाठी दिली परवानगी

English Summary: central goverment growth in exice duty on export of gold so gold rate growth Published on: 02 July 2022, 05:23 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters