केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर नियंत्रण यावे यासाठी आयातशुल्क 10.25 टक्क्यांवरून 4.25 टक्क्यांची वाढ करत 15 टक्के आता केले आहे. त्यामुळे आता सोन्याच्या आयातीवर सर्व शुल्कासह एकूण कर वाढून 18.45 टक्के का वाढला आहे.
आता हे नवे दर 30 जून पासून लागू होणार असून जगामध्ये चीन हा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
भारताची सोन्याच्या आयातीची स्थिती
चालू वर्षाच्या मे महिन्यात सोन्याच्या आयात 107 टन इतकी होती. जून मध्ये देखील एकूण आयात जास्त होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशाच्या चालू खात्यातील तुटीमध्ये भर पडत होती.कच्चा तेल यानंतर सोने आयातीत भारत सर्वाधिक खर्च करतो.
सोन्यावरील आयात शुल्क वाढवले यामुळे सोन्याची मागणी घटेल असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट कमी होईल व डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असलेल्या रुपयाचे स्थिती देखील सुधारण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते जेवढ्या आयात शुल्क वाढवले जाईल तेवढ्या प्रमाणात सोन्याच्या किमती देखील वाढतील.
नक्की वाचा:इथेनॉलनिर्मिती प्रक्रियेत गु-हाळघरांचा समावेश करा; राजू शेट्टी यांची मागणी
या निर्णयाचा किमतींवर लगेच परिणाम
सोन्यावरील आयात शुल्क वाढणार हे बातमी शुक्रवारी बाजार उघडण्याच्या आधीच समजल्याने किमतींवर परिणाम झाला.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट सोने 986 रुपयांच्या भरारीसह 51849 रुपयांवर पोहोचले तर सायंकाळी 928 रुपयांच्या वाढीसोबत 51 हजार 791 रुपये मोजावे लागले.
नक्की वाचा:कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; 'या' देशाने भारतीय कांदा आयत करण्यासाठी दिली परवानगी
Share your comments