ग्रामीण भागात शेती सोबत अनेक शेती पूरक व्यवसाय केले जातात. पशु पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्यवसाय आहे. पशुपालन केल्यास आपले शेतकरी बंधू त्यांच्या आहाराबाबत बरीच काळजी घेत असतात. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, शेतकरी कोंबड्याच्या आहारात भांगेचा समावेश करतात. कोंबड्याना भांग देण्याचा प्रकार घडत आहे थायलंड मध्ये.
थायलंडमध्ये भांग घेणे गुन्हा नाही. भांग घेण्याची परवानगी देणारा थायलंड हा आशियातील पहिला देश आहे. मात्र या देशातील शेतकरी चक्क कोंबड्यानच भांग देत आहेत. ८ जून रोजीच सरकारने भांगेची शेती करण्याची परवानगी दिली आहे. अर्थातच भांगेच्या शेतीसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. भांगेची शेती करायची असेल तर रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. दरम्यान शेतकरी कोंबड्यांना भांग देत असल्याची माहिती समोर आली आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी महिलांची शेतीशाळा; उपक्रमाची होतीये राज्यभर चर्चा
मात्र याच कारण फार मजेशीर आहे. अँटीबायोटीक्सला पर्याय म्हणून भांग देण्यात येत आहे. कोंबड्यांना अँटीबायोटीक्स द्यावी लागू नये यासाठी भांग देत असल्याचे सांगितले जात आहे. 'पॉट पोल्ट्री' नावाने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. तसेच भांग दिल्याने कोंबड्यांना आजारापासून संरक्षण मिळते असेही सांगितले जात आहे. तेथील कोंबड्यांना अँटीबायोटिक्स देऊनसुद्धा एवियन ब्रोन्कायटीसची लागण झाली होती. चीयांग माई विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, भांग असलेल्या खाद्यांचा आहारात समावेश केल्याने या रोगाचा धोका कमी होतो.
त्यामुळे तेथील शेतकरी कोंबड्यांना भांगेची पाने देणे तसेच पाण्यात भांग मिसळून कोंबड्यांना दिले जात आहे. सध्या १ हजार कोंबड्यांवर भांग देण्याचा प्रयोग सुरु आहे. या प्रयोगातून अजून एक माहिती समोर आली की, भांगेमुळे कोंबडीचे मांस व अंडी यावर कोणताच परिणाम झाला नाही. तसेच कोंबडीच्या वर्तनातही कोणताच बदल झालेला नाही. भांगेचा अतिरिक्त वापर टाळल्यास ते औषधाचे काम करते हे या पूर्वीही सिद्ध झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
विमा कंपनीला दणका; २०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
'साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची अघोरी लूट केली'; शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषदेचे आयोजन
Share your comments