राज्यात सध्या भोंग्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक जाती धर्म हे एकमेकांवर जोरदार राजकीय हल्ले करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात हे अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र एका बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी भोंगे वाजवायला कोणाला वेळ नाही, यामुळे सध्या राज्यात ऊस आणि कांद्याचे प्रश्न खूपच गंभीर झाले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या आपल्याला कुणीही वाली नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे, म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याच्या दराचा वांदा झाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर पडले आहेत, तर शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात नसल्याने मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत उन्हाळ कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दर कमालीचे घसरतात. दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील विंचूर बाजार समितीत कांद्याची 5 रुपये क्विंटल इतक्या कमी दराने विक्री झाली. यामध्ये भाडेही निघत नाही. याउलट रासायनिक खतांच्या दरवर्षी वाढत जाणार्या किमती या काही केल्याने कमी होत नाहीत, यामुळे खर्च वाढतोय मात्र पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नेमके करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती...
महागडी औषधे यांचा वापर वाढल्याने खर्चाचे गणितच बिघडले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. यातच कांदा ठेवल्याने तो खराब होणार आहे. यामुळे आता कांदा ठेवला तरी वांदा आणि विकला तरी वांदा अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच महाराष्ट्रासह कर्नाटकात परतलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आता निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार! मोदी सरकारने केली तयारी
असेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याबाबत सध्या घडत आहे, अतिरिक्त उसाचे नियोजन नीट केले नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तुटले गेले नाहीत. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. मे महिना संपत आला तरी अनेकांचे ऊस तुटले गेले नाहीत, यामुळे अनेकानी आपले ऊस पेटवून दिले आहेत. मात्र राजकीय लोकांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
महत्वाच्या बातम्या;
महादेव जानकरांनी थेट गाईच्या धारा पिळत मांडले दुग्ध व्यवसायातील आर्थिक गणित, वाचा...
पेट्रोल- डिझेल स्वस्त, फायदा थेट शेतकऱ्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
Share your comments