1. कृषीपीडिया

ऊस पिकातील तण नियंत्रण

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ऊस पिकातील तण नियंत्रण

ऊस पिकातील तण नियंत्रण

तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड, रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे परंतु मजुरांची कमतरता मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे, घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात_

या तणांच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

१) प्रतिबंधात्मक उपाययामध्ये पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी, लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. मात्र, मशागत करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

२)जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.

३)तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.

ऊस पिकात आंतरपिकानुसार तणनाशकांचा वापरउसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही परंतु आवश्‍यकतेनुसार खुरपणी करावी खाली दिल्याप्रमाणे निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

शिफारशीनुसार योग्य प्रमाणात वेळेवर तणनाशकांचा वापर करावा.

तण उगवणीपूर्वी तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे, संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे.

तणनाशके फवारताना मागे मागे सरकत यावे व फवारलेली जमीन तुडविली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.

तणनाशक फवारल्यानंतर ३ ते ४ दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये, फवारणी केलेल्या क्षेत्रातील चारा जनावरांना वापरू नये.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

प्रतिनिधी - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters