1. कृषीपीडिया

रब्बी उन्हाळी कांदा पिकामध्ये खत आणि तण व्यवस्थापन

कांदा हे भारत देशाचे एक महत्वाचे पिक आहे. भारतामध्ये 1.29 मिलियन हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून 23.26 मिलियन टन उत्पादनाची नोंद आहे. भारत देशाची कांदा उत्पादकता नोंद 18.1 टन/ हे. आहे. देशात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनामध्ये प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्राचे 508 हजार हे क्षेत्र कांदा पिकाखाली असून 8,854 हजार टन उत्पादनाची नोंद आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Onion

Onion

कांदा(onion) हे भारत देशाचे एक महत्वाचे पिक आहे. भारतामध्ये 1.29 मिलियन हेक्टर क्षेत्र कांदा पिकाखाली असून 23.26 मिलियन टन उत्पादनाची नोंद आहे. भारत देशाची कांदा उत्पादकता नोंद 18.1 टन/हे. आहे. देशात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनामध्ये प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्राचे 508 हजार हे क्षेत्र कांदा पिकाखाली असून 8,854 हजार टन उत्पादनाची नोंद आहे.

कांदा लागवडीच्या आवश्यक बाबी 

कांदा पिकाचे खरीप, रांगडा तसेच रब्बी (उन्हाळी) असे महत्वाचे प्रकार आहेत. रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये केली जाते. साधारणतः 8-10 किलो बियाणांपासून रोपवाटिका (नर्सरी) तयार केल्यास एक हेक्टर क्षेत्र लागवड करण्यासाठी रोपांची संख्या पुरेशी असते. साधारणतः 8-9 आठवड्याच्या रोपांपासून 15x10 सेमी अंतरावर पुनर्लागवड करतात.

खत व्यवस्थापन

कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या शिफारशीनुसार पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. नत्र विभागून दोन ते तीन हफ्त्यात दिले असता त्याचा चांगला फायदा होतो. कांदा पूर्ण पोसल्यानंतर मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिले तर डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात. तेव्हा शिफारस केलेले नत्र लागवडीनंतर रब्बी-उन्हाळी हंगामात 45-60 दिवसांत दोन हफ्त्यात विभागून देणे फायदेशीर ठरते.

हेही वाचा:फिश अमीनो एसिड बनवण्याची उत्तम व सुलभ पद्धत

पिकांच्या मूळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. स्फुरदाची मात्रा एकाच वेळी आणि ती पिकांच्या लागवडीवेळी द्यावी. जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर आहे, मात्र पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी असल्यामुळे कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, तसेच कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी, पालाशची आवश्यकता असते. पिकाच्या लागवडीवेळी स्फुरदाबरोबर पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. या व्यतिरिक्त रब्बी हंगाम कांदा पुनर्लागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर गंधक हेक्टरी 45 किलो या प्रमाणात द्यावे.

पश्चिम महाराष्ट्रासाठी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या शिफारशीनुसार रब्बी कांदा पिक खत व्यवस्थापन (किलो/ हेक्टरी)

वेळ

नत्र (युरिया)

स्फुरद (एसएसपी)

पालाश (एमओपी)

लागवड

50 (108.5)

50 (312.5)

50 (83.5)

लागवडीनंतर 30 दिवसात

25 (54.25)

-

-

लागवडीनंतर 45 दिवसात

25 (54.25)

- -


माती परिक्षणानुसार खत मात्र द्यावी. कांदा पिकास नत्र शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसानंतर दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते मान जाड होतात. कंद आकाराने लहान राहतो. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवणक्षमता कमी होते.

तण व्यवस्थापन  

कांदा पिकाची घनता तीव्र असते तसेच पिकाच मूळ उथळ असल्यामुळे पिक-तण स्पर्धा कालावधी लागवडीपासून ते 45 दिवसापर्यंत खूप असतो. जर या पिक-तण स्पर्धा कालावधीमध्ये खुरपणी करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्यास कांद्यामध्ये 45-60 % उत्पादन घटण्याची शक्यता असते. म्हणून या काळामध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कांद्याच्या अधिक उत्पादन व तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन 23.5% . सी. 1-1.25 मिली/ लिटर पाणी या प्रमाणात (लागवडीच्या 2 दिवस अगोदर किंवा लागवडी पासून एक आठवडयाच्या आत) फवारणी करावी तसेच लागवडी पासून 30 दिवसांनी एक खुरपणी करावी. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे असते.

डॉ. साबळे पी. .
(सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के, खेडब्राह्मा)
८४०८०३५७७२
डॉ. चंदारगी एमके.
(सहाय्यक प्राध्यापक, कृषी किटकशास्त्र विभाग, कपास संशोधन केंद्र, तळोद, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात)
सुषमा सोनपुरे 
(आचार्य पदवी विद्यार्थींनी कृषीविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
 

English Summary: Fertilizer & Weed Management in Rabi Summer Onion Published on: 20 December 2019, 03:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters