1. बातम्या

कांद्याचा नाशिकमध्ये वांदा, शेतकरी म्हणाले कांद्यासाठी पुणे मार्केटच लय भारी..

farmers say pune market is the rhythm for onion

farmers say pune market is the rhythm for onion

गेल्या काही दिवसांपासून पडलेले कांद्याचे दर सध्या काही वाढले आहेत, यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळू लागले आहेत. असे असताना आता कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून नाशिकला राज्यात ओळखले जाते. मात्र सध्या वेगळे चित्र आहे. सध्या चर्चा सुरु आहे ती पुणे मार्केटची कारण पुण्यात ( Onion Rate ) कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 787 असा दर आहे तर मुख्य आगारात 1 हजार 509 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

हे सगळे नाफेडमुळे झाले आहे. सध्या नाफेडकडून राज्यात ठिकठिकाणी कांदा खरेदी सुरु आहे. नाफेड ही एक सरकारची संस्थाअसून किमान या संस्थेने तरी दरात दुजाभाव करायला पाहिजे नाही. मात्र, बाजारपेठेनुसार आपले धोरण बदलून एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक या माध्यमातून केली जात आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत. याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.

राज्यभरातील बाजारपेठेतून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे. कमी भावात कांद्याची खरेदी करुन त्याची साठवणूक करायची आणि बाजारपेठेतले दर वाढतच पुन्हा साठवणुकीतला कांदा बाहेर काढून दरात समतोल राखला जावा हे सरकारचा यामागचा उद्देश आहे. मात्र यामध्ये अनेकदा वेगळे चित्र बघायला मिळते. यासंदर्भात शेतकरी संघटनेने अनेकदा आवाज उठवला असताना देखील अनियमितता ही सुरु आहे.

'आता साखर कारखानदार, संचालक आणि उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील'

नाफेडने राज्यात एकाच दरात कांदा खरेदी करणे गरजेचे आहे. तसे न करता नाफेडकडून दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये 1 हजार 509 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कांदा घेतला गेला तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मात्र, 1 हजार 787 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी कऱण्यात आली. त्यामुळे हान दुजाभाव का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे आता नाशिकपेक्षा पुण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महत्वाच्या बातम्या;
दारू पिल्यावर तो व्यक्ती इंग्रजी संभाषण का करतो, जाणून घ्या खरे कारण..
मोठी बातमी! दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी, अमूल ग्रुपने घेतला मोठा निर्णय..
काय सांगता! स्वत:च्या लग्नाला आमदार गैरहजर, गुन्हा दाखल; म्हणाले, मला लग्नाबद्दल कुणी सांगितलंच नाही..

English Summary: Wanda of onion in Nashik, farmers say Pune market is the rhythm for onion. Published on: 20 June 2022, 10:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters