एका बाजूला खरीप हंगामातील पिकांसाठी रासायनिक खतांचा तुटवडा भासत आहे तर दुसऱ्या बाजूला कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की पिकांसाठी रासायनिक खते कमी वापरन्याचे धोरण आखले आहे. अगदी लगेचच रासायनिक खतांची मात्रा कमी करता येत नाही तर ती मात्रा टप्याटप्याने कमी करावी लागते जे की याच अनुषंगाने पावले उचलली जात आहेत. जालना कृषी विभागाने या वर्षांपासून चांगला उपक्रम हाती घेतलेले आहे. कसे की दरवर्षी जेवढे खरिपाचे क्षेत्र असेल त्या क्षेत्रापैकी एकूण १० टक्के क्षेत्रावर रासायनिक खतांचा आजिबात वापर करायचा नाही. जे की याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना एक वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्याचे जालना मधील कृषी विभागाने ठरवले आहे.
शेतकऱ्यांना जैविक खताचा पर्याय :-
जरी रासायनिक खताचा दुष्परिणाम जमिनीवर तसेच पिकांवर होत असला तरी लगेच त्याची मात्रा पूर्णपणे कमी करता येणार आहे. केंद्र सरकार तर नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे शेतकऱ्याना वारंवार आवाहन करत आहे, मात्र हे प्रत्यक्षात शक्य नाही जे की ही झालेली घोषणा हवतेच आहे. मात्र जालना कृषी विभागाने केलेली घोषणा फक्त घोषणाच नाही तर त्याची अंमलबजावणील देखील सुरुवात केलेली आहे. रासायनिक खताला पर्याय म्हणून कृषी विभाग जालना कडून जैविक खत तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा फायदा यामुळे लक्षात येणार असून अचनकरित्या उत्पादनात घट देखील होणार नाही.
एकूण क्षेत्राच्या १० टक्के क्षेत्रावर हा प्रयोग :-
अचानकपणे रासायनिक खते बंद करणे शक्य नाही म्हणून जालना कृषी विभागाने यावर पर्याय काढला आहे. जालना जिल्ह्यामध्ये ६ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. जे की यानुसार दरवर्षी १० टक्के क्षेत्रावर रासायनिक मुक्त शेतीवर भर द्यायचा. केलेला बदल हा शेतकऱ्यांना मोठा वाटत नाही मात्र कृषी विभागाचा उद्देश साध्य होतोय. काही काळाने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व लक्षात येईल असा विश्वास देखील कृषी विभागाला आहे. जे की यासाठी जिल्ह्यातील ८ तालुके निवडले आहेत. जैविक खतांच्या निर्मितीचा कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आला आहे.
या पद्धतीने होणार जैविक खत तयार :-
जालना जिल्ह्यामध्ये नाडेप च्या २ हजार ३५ युनिट तंत्राद्वारे ८ हजार १४० मेट्रिक टन खत निर्माण केले जाणार आहे. एवढेच नाही तर 702 गांडूळ खत उत्पादन प्रकल्पामधून ४ हजार २१२ मेट्रिक टन गांडूळ खत तयार केले जाणार आहे. विद्राव्य खताचा वापर वाढवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. १४१ हेक्टर वर हा अनोखा उपक्रम राबिवला जाणार आहे.
Share your comments