1. बातम्या

अखेर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश; शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द,कर्ज घेणं होणार सोपं

गेली पन्नास वर्षे या गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर देवस्थानचे नाव असल्याने त्यांना आपल्या जमिनीवर कर्ज घेता येत नव्हते. शिवाय कोणत्याही विकास कामांना चालना मिळत नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी देवस्थानची नावे रद्द करण्याची मागणी करत होते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
देवळाली विधानसभा मतदार संघातील तीन गावातील शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द

देवळाली विधानसभा मतदार संघातील तीन गावातील शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द

नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदार संघातील तीन गावातील शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विहितगाव, बेलत गव्हाण, मनोली या गावातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. गेली पन्नास वर्षे या गावातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर देवस्थानचे नाव असल्याने त्यांना आपल्या जमिनीवर कर्ज घेता येत नव्हते.

शिवाय कोणत्याही विकास कामांना चालना मिळत नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी देवस्थानची नावे रद्द करण्याची मागणी करत होते. नाशिक शहराला लागून असलेल्या या तीन गावात म्हणजेच विहितगाव 211.97 हेक्टर, बेलतगव्हाण 291 हेक्टर, मनोली 350 एकर इतक्या मोठ्या जमिनी असल्याने शेतकऱ्यांकडून सातत्याने या जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द करण्याची मागणी केली जात होती.

अखेर शेतकऱ्यांनी न्यायालयातील लढा जिंकलाच. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नाव हटविण्यासाठी आमदार सरोज अहिरेंसंह अनेकांनी पाठपुरावा केला आहे. तसेच अनेकांनी यासाठी न्यायालयात लढा दिला आहे. देवस्थानची नावे रद्द करण्याच्या निर्णयामुळे आता तिन्ही गावातील विकास होण्यास मदत होईल. त्यामुळे इतक्या वर्षानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे.

गव्हानंतर तांदूळ निर्यातीवरही बंदी? भारतात तांदळाची किंमत १० टक्क्यांनी वाढली

चुकून झालेल्या नोंदीमुळे विहितगाव, बेलतगव्हाण आणि मनोली या गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना गेली पन्नास वर्षे त्रास सहन करावा लागला. त्यावेळी गैरसमजातून नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांनी सरकारी परिपत्राच्या आधारे नोंद टाकली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी अपील दाखल केले होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पाठपुराव्यामुळे न्याय मिळाल्याचे अपीलकर्ता निवृत्ती अरिंगळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:
इथेनॉलनिर्मिती प्रक्रियेत गु-हाळघरांचा समावेश करा; राजू शेट्टी यांची मागणी
कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; 'या' देशाने भारतीय कांदा आयत करण्यासाठी दिली परवानगी

English Summary: Ultimately the success of the farmers ’efforts; Canceling the names of temples on farm land Published on: 30 June 2022, 02:25 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters