1. कृषीपीडिया

शेतकऱ्यांचे शेत जमीन मोजणीचे वर्ष भरापासुनचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढा.

शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे सरनाईक यांचे भुमिअभिलेख कार्यालयात आंदोलन.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांचे शेत जमीन मोजणीचे वर्ष भरापासुनचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढा.

शेतकऱ्यांचे शेत जमीन मोजणीचे वर्ष भरापासुनचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढा.

चिखली-तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मोजणीसाठी भुमि अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करूण पैसे भरणा केला आहे.परंतू वर्ष उलटुनही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,भगवानराव मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना भेडसावनाऱ्या समस्या घेवुन उप अधिक्षक यांच्या चिखली येथील कार्यालयात दि१०/०६/२०२२ ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिखली भुमि अभिलेख कार्यालयाकडे शेतरस्ते मोकळे करण्यासाठी,हिस्से वाटे झालेली जमीन सातबारा नुसार क्षेत्रफळ निश्चित करणेसाठी अर्ज केले आहेत.यामधे काहिंनी साधी मोजणी,तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणीसाठी भुमि अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करुण नियमा प्रमाणे पैसाचा भरणा देखील केला आहे.

परंतु पैसे भरलेल्यांचा शेत मोजणीचा विहित कालावधी उलटुन देखील प्रकरणे निकाली निघाले नसल्याने अनेकांना दुबार पैसे भरणा करावा लागला असल्याने आर्थीक भुर्दड सोसावा लागत आहे. अनेकांची मोजणी झाली परंतु आजपर्यत हद्दकायम (खुना) निश्चीत केलेल्या नसल्याचे व शेतात गेल्या नंतर मोजणी मशीन नादुरुस्त होणे,व विविध कारणे दाखवुन अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याने व पैसे घेवुन काम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.तर दुसरीकडे मात्र कर्मचारी कमी असल्याचे सांगुन वेळकाढु धोरण अवलंबले जात असल्याने पावसाळा तोंडावर आला असल्याने मोजणी होणार तरी कधी?असा सवाल शेतकरी उपस्थीत करीत असुन याबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतरही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानीसह शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत उप अधिक्षक

यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती तर एक प्रकारे कार्यालयाचा ताबाच शेतकर्यानी घेतला होता.दरम्याण तालुक्यातील प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे,विहीत वेळेत मोजणी न करणे हि कार्यालयाची चुक असुन दुबार पैसे भरणा केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यात यावी,साधी मोजणी,तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणीसाठी पैसे भरणा करुनही प्रकरणे प्रलंबीत का राहली या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी,रीक्त असलेली पद भरण्यात यावे व भुमि अभिलेख कार्यालयातील प्रभारी पदावर कायमस्वरूपी उप अधिक्षकाची नेमणुक करण्यात यावी,यासह आदि मागण्या करण्यात आल्या असुन या आंदोलनामुळे अनेकांची मोजणीची तारीख निश्चित करण्यात आली असुन अनेकांच्या समस्या देखील आंदोलनामुळे मार्गी लागल्या आहेत.तर मागण्यांची पुर्तता करण्याचे अश्वासन वरीष्ठांकडुन देण्यात आल्याने चार तासानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.

तर शेतकऱ्यांच्या समस्या न सुटल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितिन राजपुत,भारत वाघमारे,अनिल वाकोडे,रविराज टाले,शुभम पाटिल,बाळकृष्ण पाटिल,अमोल तिडके,रवि मेहत्रे,सुनिल मोरे,सरदारसिंग इंगळे,औचितराव वाघमारे,मधुकर सोळंकी,अनिल शिराळे,गोपाल परसणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.धुळखात पडलेल्या रीकाम्या खुर्चीचेच केले स्वागत.अनेक दिवसा उप अधिक्षक या पदाचा प्रभार देण्यात आला आहे.परंतु प्रभारी अधिकारी सुद्धा आॅफीसमधे येत नसल्याचे कार्यालयातील व टेबलवर चढलेल्या धुळीवरुण उघड झाल्याने व कार्यालयातील साफ सफाई होत नसल्याचे समोर आल्याने अधिकारीच नसेल तर कर्मचारी यांच्यावर नियंत्रण राहणार कसे व प्रलंबीत कामे होणार कसी? असा सवाल उपस्थीत करत रीकाम्या खुर्चीचे स्वागत करण्यात आले.

English Summary: Settle the pending cases of farmers' farm land census throughout the year. Published on: 02 June 2022, 07:38 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters