Malegaon : सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाचा प्रश्न असो किंवा गव्हाच्या निर्यातीबंदीवरील प्रश्न असो असे एक ना अनेक प्रश्नांनी शेतकरी हैराण झाले आहेत. आता तर कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे गेले काही दिवस शेतकरी व शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.
कांद्याला चांगला भाव मिळवा यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्य मार्गावरच रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. कांद्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळावा, तसेच कांदा साठवूकीसाठी यंत्रणा उभारावी अशा मागण्या करीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. कांदा बाजारपेठेत दाखल झाल्यापासून त्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. या गोष्टीला कंटाळून काहींनी कांद्याचे फुकटात वाटप केले.
तसेच नाफेडच्यावतीने कांदा खरेदी सुरु असतानाच मालेगाव जिल्ह्यामधील शेतकरी दराला घेऊन नाराज होते. तीन ते चार महिन्यांपासून कांद्याला हवे तसे दर नाहीत त्यामुळे कांदा उत्पादकांना बऱ्याच आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणे वाढली आहेत.
सावधान ! देशात अजून कोरोना सक्रिय; एका दिवसात घावले तब्बल 'इतके' रुग्ण
त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना साह्य व्हावे यासाठी किमान 1 हजार 500 ते 2 हजार आधारभूत किमतीला खरेदी करावा. तसेच विकलेल्या कांद्याला क्विंटल मागे 500 रुपयांच्या अनुदानाची मागणी शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नाफेडच्या माध्यमातून राज्यातील मुख्य बाजारपेठेतून कांदा खरेदी सुरु आहे.
५२ हजार शेतक-यांना ४७० कोटींची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा
भविष्यात जर कांद्याचे भाव वाढले तर नाफेडकडील कांदा बाजारपेठेत आणला जातो. त्यामुळे दर नियंत्रित राहते. परंतु , जी नाफेडकडून खरेदी केली जात आहे त्यात अनियमितता आहे. त्यामुळे नाफेडने शेतकऱ्यांकडून एकाच किंमतीमध्ये कांदा खरेदी करावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने झाला मोठा निर्णय
Share your comments