1. पशुधन

जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्र आणि राज्याच्या पुढाकाराने झाला मोठा निर्णय

देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो, यामधून अनेक शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. असे असताना आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाची राज्यांकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. आपण बघतो की अजूनही अनेक गावांमध्ये पशूवैद्यकीय रुग्णालय वगळता गाव खेड्यात (Treatment of animals) जनावरांवरील उपचाराकरिता योग्य ती यंत्रणा नाही. यामुळे जनावरांची गैरसोय होते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Treatment of animals is now a big decision in the village

असे असताना आता मात्र, गावातच जनावरांवर उपचार करण्यासाठी 80 (Mobile Van) मोबाईल व्हॅन चिकित्सालय पर्याय राज्यात उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पशूपालकांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत. यामुळे जनावरांवर वेळीच उपचार होणार आहेत. निधीची उपलब्धता होताच राज्या सरकारला या निधीचे वितरण करावे लागणार आहे. अनेक शेतकरी याबाबत मागणी करत होते.

तसेच प्रस्तावित कॉल सेंटरवर पशूपालकांनी संपर्क साधल्यानंतर ही सुविधा मिळणार आहे. यामध्ये वेळेत आणि जागेवर सेवा मिळवून देण्याच्या अनुशंगाने ही सेवा देण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या समस्या कमी होणार आहेत. पुणे किंवा नागपूर या ठिकाणी कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. संबंधित कॉलसेंटरवर संपर्क साधल्यानंतर पशूपालकाच्या गावात ही मोबाईल व्हॅन पोहचणार आहे. याचा हे फायदेशीर ठरणार आहे.

शेळीपालन अ‍ॅप: 'हे' मोबाइल अ‍ॅप शेळीपालनाबद्दल देतात चांगली माहिती, मिळेल दुप्पट नफा

राज्यात सध्या 4 हजार 448 पशुचिकित्सालये आहेत. असे असले तरी अनेकदा उपचार मिळण्यास उशीर होतो आणि यामध्ये जनावरे दगावण्याची शक्यता वाढते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याकरिता केंद्र सरकारकडून निधीचे हस्तांतरण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे करण्यात आला आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पशूपालकांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
यंदा शेतकरी हतबल; या भागात पहिल्यांदा शेतकरी असल्याची खंत
21 हजाराला विकला जातोय फक्त एक आंबा, या आंब्याची राज्यात चर्चा...
पुण्यात रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, दीड कोटींचे बक्षीस...

English Summary: Treatment of animals is now a big decision in the village itself, with the initiative of the Center and the State Published on: 19 May 2022, 03:18 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters