धुळे येथील एलसीबीच्या पथकाने शेती अवजारे चोरणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले. तसेच टोळीकडून तब्बल दहा गुन्ह्यांची उकल केली. साक्री तालुक्यात शेती अवजारे चोरीच्या घटनांत वाढ होत असताना बारकुंड यांनी असे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली.
त्यानुसार जैताणेतील रोटाव्हेटर चोरीच्या गुन्ह्यासह साक्री, पिंपळनेर पोलिस ठाण्यात दाखल शेती अवजारे चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक माहितीवरून एलसीबीच्या पथकाने सोमियेल दामजी वसावा ऊर्फ समुवेल दामू गावित ऊर्फ टकल्या (वय २९), विपीन वसंत मावची (२६, रा. लहान चिंचपाडा, ता. नवापूर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी नवापूर तालुक्यातील सुरेश गावित, कैलास इशया वसावे, किशोर दिवज्या गावित, प्रभू होड्या गावित, अनिल लंगडया, योहान जेनू गावित, दिलीप रेवत्या गावित व अनिल रामसिंग गावित यांच्या मदतीने निजामपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शेती अवजारे चोरी केल्याची कबुली दिली.
LiGHT अकोल्याच्या सदस्यांचा बाभुळगाव येथील 'कृषोन्नती' कार्यक्रम यशस्वी
त्यांच्याकडून शक्तिमान कंपनीचे रोटाव्हेटरसह ३० हजारांचे लोखंडी नांगर, असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून शेतकरी चोरीच्या तक्रारी देत होते.
लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...
पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा, निजामपूर पोलिसांत याबाबत दाखल दहा गुन्हे उघडकीस आणले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
५५०० रुपये लिटरला गाढवाचे दूध विकणारा हा माणूस झाला करोडपती
शेतकऱ्यांनो पावसाळा येतोय, पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या...
उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..
Share your comments