1. यांत्रिकीकरण

छोट्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; भाड्याने मिळणार कृषी अवजारे

KJ Staff
KJ Staff


आजघडीला शेती क्षेत्रात आधुनिक अवजारांचे महत्त्व वाढले आहे. प्रामुख्याने वेळ आणि पैशांची बचत करणारी कृषी अवजारे ही आधुनिक शेतीसाठी अत्यावश्यक बनली आहेत. मात्र, छोट्या शेतकऱ्यांना ही कृषी अवजारे वेळेवर उपलब्ध होणे अडचणीचे ठरते. त्यांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आणखी आहे. सरकारने देशभरात स्थापन केलेल्या 42000 कस्टमर हायरिंग सेंटरमधून ही अवजारे भाड्याने शेतकरी घेऊ शकणार आहेत. कृषी अवजारे शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावीत यासाठी लागू केलेली ही योजना वरदानच ठरणार आहे.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारे अत्यंत गरजेची बनली आहेत. पारंपरिक पद्धतीने पशूधन बाळगून त्यांच्या मदतीने शेती करणे हे वेळखाऊ आणि खर्चिक असल्याचे शेतकऱ्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे आज आधुनिक अवजारांशिवाय शेती हा विचारच शेतकरी करू शकत नाही. आधुनिक कृषी अवजारांमुळे कष्ट कमी होतात आणि कामही कमी वेळात, चांगल्या दर्जाचे होते. शेती उत्पादनात वाढ होते. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडी अवजारे घेणे अशक्य आहे.

हेही वाचा : महिंद्रा कंपनीने लॉन्च केले बटाटा लागवडीचे यंत्र

केंद्र सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँक स्थापन केली आहे. याअंतर्गत सरकारने देशभरात ठिकठिकाणी 42000 कस्टमर हायरिंग सेंटर स्थापन केले आहेत. दहा लाखांची शेती अवजारे या योजनेसाठी ठेवण्यात आले आहेत. या सगळ्यामध्ये 80 टक्के रक्कम हे सरकार भरणार आहे. म्हणजे 10 लाख रुपयांपैकी आठ लाख रुपयांची सब्सिडी दिली जाईल. उरलेली 20 टक्के रक्कम हे शेतकरी स्वतः किंवा शेतकऱ्यांचा गट बँकेद्वारे कर्ज घेऊन जमा करू शकतात. या केंद्रांतून छोट्या शेतकऱ्यांना भाड्याने आधुनिक कृषी अवजारे मिळतील. म्हणजेच शेतकऱ्यांना आठ लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल.या योजनेतून कृषी अवजारे भाड्यावर देण्यासाठी सरकारने सीएचसी फार्म मशिनरी हे मोबाईल ॲप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी अवजारे सहजतेने उपलब्ध होतील. हे ॲप शेतकऱ्यांना कृषी अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी मदत करेल. गुगल प्ले स्टोअरमधून आपण हे अॅप डाऊनलोड करू शकतो.

योजनेसाठी असा कराल अर्ज

ज्या शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठीच्या अनुदानासाठी अर्ज करायचा असेल, त्या शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएफसी) जावे लागेल. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रातील कोणत्याही ई-मित्र कीऑसवर जाऊन अर्ज करता येईल. त्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते.

आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती अशी ः आपण जे कृषी उपकरण खरेदी केले आहे त्याचे बिल, आधारकार्ड, आपला फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters