1. बातम्या

उन्हामुळे चिकनच्या दरात मोठी, पिलांची मर वाढली..

यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. उष्णतेत अचानक चढ उतार होत असतात. याचा फटका पोल्ट्री व्यवसायावर होतो. त्यामुळे पिलांची मर जास्त होते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
price of chicken increased (image google)

price of chicken increased (image google)

यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. उष्णतेत अचानक चढ उतार होत असतात. याचा फटका पोल्ट्री व्यवसायावर होतो. त्यामुळे पिलांची मर जास्त होते.

त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात नवा लाॅट घेत नाहीत. किंवा उत्पादन वाढविण्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात चिकनच्या दरात सुधारणा झालेली दिसते. सध्या चिकनला लिफिंग रेट १६८ रुपये प्रतिकिलो आहे.

हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. पण दुसरीकडे उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात चिकनची किरकोळ विक्री २८० ते २३० रुपये प्रतिकिलोने होत आहे.

राज्यातील धरणांनी गाठला तळ, पावसाने फिरवली पाठ...

देशात वर्षाला ४० लाख टन चिकनचे उत्पादन होते. याचे मुल्य जवळपास १ हजार ८५० कोटी रुपये असते. देशाच्या एकूण मांस उत्पादनात चिकनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे. यामुळे हा आकडा मोठा आहे.

उष्णता वाढल्याने शेतकऱ्यांनी प्लेसमेंट कमी केले होते. ऊनचा पारा कमी झाल्यानंतर प्लेसमेंटमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे उत्पादनही वाढेल. सध्या कर्नाटक हेदराबदमध्ये दर वाढले आहेत.

पट्ट्याने थार गाडीने नांगरने वावर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..

तसेच चेन्नई, बेंगलोरमध्ये देखील दर वाढले आहेत. केरळमध्ये मटणापेक्षा चिकनचे भाव वाढल्याचे सांगितले जाते. पावसाळा सुरू झाल्यावर दर कमी होतील, असे म्हटले जात आहे.

LiGHT अकोल्याच्या सदस्यांचा बाभुळगाव येथील 'कृषोन्नती' कार्यक्रम यशस्वी
गुजरातमध्ये येत असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा सामना करण्यासाठीच्या केंद्र सरकार सज्ज, अनेकांना सुरक्षित स्थळी हलवले..
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना 1500 कोटींच्या मदतीची घोषणा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देणार..

English Summary: Due to heat, the price of chicken increased, the death of chicks increased. Published on: 14 June 2023, 02:40 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters