1. बातम्या

लसणाची प्रति किलो दोनशे रूपयांकडे वाटचाल, शेतकरी सुखावला...

काही दिवसांपूर्वी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता. आता ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. तसेच पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Garlic moves towards two hundred rupees per kg (image google)

Garlic moves towards two hundred rupees per kg (image google)

काही दिवसांपूर्वी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता. आता ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. तसेच पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात. असे असताना मात्र यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी झाले आहे. यामुळे आधीच दरवाढ होईल, असे सांगितले जात होते.

त्यामुळे लसूण महागले आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटली असून भाव वधारले आहेत.

राज्यातील धरणांनी गाठला तळ, पावसाने फिरवली पाठ...

दरम्यान, गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ९० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या लसणाच्या दरात २०-३० रुपयांनी दरवाढ झाली. आता ११० ते १५० रुपयांवर दर गेले आहेत. यामुळे ही वाटचाल 200 रुपयांपर्यंत जाईल.

पट्ट्याने थार गाडीने नांगरने वावर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..

पाच वर्षांपूर्वी २०१७ मध्ये लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रतिकिलो लसणाचे दर २०० ते २५० रुपयांवर गेले होते. आता देखील पुढील काळात लसूण २०० पार करेल, असे म्हटले जात आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LiGHT अकोल्याच्या सदस्यांचा बाभुळगाव येथील 'कृषोन्नती' कार्यक्रम यशस्वी
गुजरातमध्ये येत असलेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा सामना करण्यासाठीच्या केंद्र सरकार सज्ज, अनेकांना सुरक्षित स्थळी हलवले..
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना 1500 कोटींच्या मदतीची घोषणा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देणार..

English Summary: Garlic moves towards two hundred rupees per kg, farmers happy... Published on: 14 June 2023, 02:24 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters