अमरावती : शेतकरी बंधू शेती व्यवसायात अमाप कष्ट घेत असतात. नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीत उल्लेखनीय काम करतात. त्यावेळी त्या शेतकऱ्यांचे योगदान सर्वांना माहित होते शिवाय अनेकजण त्यातून प्रेरणादेखील घेतात. शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे शेती व्यवसायात अधिकाधिक वृद्धी व्हावी यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात.
शेती व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व शेतकरी बंधूंचा सन्मान केला जातो. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने ही परंपरा जोपासली जात आहे. शेतकरी बंधूंनी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करावे व शेती व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करावी या उद्देशाने दरवर्षी राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याचे शेती व्यवसायातील यश, कामगिरी, योगदान, तसेच कृषी क्षेत्रात आजमावलेले प्रयोग जगासमोर येतात व त्यातून इतर शेतकऱ्यांना त्यातून प्रेरणा घेता येते.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत धामनगाव तालुक्यातील भिल्ली येथील रमेशराव साखरकर. सन्मानाचं वेगळेपण म्हणजे, जिथे काळ्या आईची सेवा केली जात आहे तिथेच त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो.
आता अवघडच झालं! म्हशीच्या खऱ्या मालकाला शोधण्यासाठी दिले DNA चाचणीचे आदेश
गावरान देशी बियाणेचे संवर्धन,जतन व निर्मितीसाठी पुरस्कार प्रदान
धामनगाव तालुक्यातील रमेशराव साखरकर यांनी शेती करताना पारंपारिक शेतीची कास सोडली नाही. गावरान बियाणांचा वापर करून त्यांनी शेती व्यवसायात उत्कृष्ट यश मिळवले आहे. शेती सोबत त्यांनी इतर शेती संबंधित व्यवसायाकडेदेखील लक्ष दिले. गावरान देशी बियाणेचे संवर्धन, जतन आणि निर्मितीसाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. व त्याच्या माध्यमातून शेती केली व इतरांनाही त्याचे महत्व पटवून दिले. प्राकृतिक पोषण आहारासाठी गावरान बियाणांशिवाय पर्याय नसल्याचं रमेशराव साखरकर सांगतात.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल
शासनाकडून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांना पुरस्कार दिले जातात. मात्र कष्ट शेतात अन पुरस्कार मिळणार शहरांमध्ये. या संस्थेची हीच विशेषता आहे. जी शेतकऱ्यांना शेतामध्येच जाऊन पुरस्कार प्रदान करते.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; विकास महामंडळाचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो पिकलेल्या शेतमालावर विक्री आधीच घ्या कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित
Share your comments