1. बातम्या

केंद्र सरकारने गहू निर्यातीबाबत घेतला मोठा निर्णय; जगातील प्रमुख देशात होणार निर्यात

सध्या जगभरातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताने या चालू असलेल्या आर्थिक वर्षात १०० लाख टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
जगातील प्रमुख देशात होणार निर्यात

जगातील प्रमुख देशात होणार निर्यात

Wheat Export : केंद्र सरकार गहू निर्यातीच्या शक्यता आजमावण्यासाठी इंडोनेशिया, फिलिपाईन्ससह जवळजवळ ९ देशांत आपले व्यापारी शिष्टमंडळ पाठवणार आहेत. मात्र सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्राच्या माध्यमातून होणारी निर्यात खंडित झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशातील गव्हाचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे विविध देशांनी भारताकडे गव्हाची विचारणा केली आहे.

या पार्श्ववभूमीवर भारत सरकारदेखील गहू निर्यातीसाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. केंद्र सरकार हे मोरोक्को, इंडोनेशिया, ट्युनिशिया, फिलिपाईन्स,थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्गेरिया आणि लेबनान आदी देशांत व्यापारी शिष्टमंडळ पाठवणार आहे असं केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.

सध्या जगभरातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताने या चालू असलेल्या आर्थिक वर्षात १०० लाख टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.भारताने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात जवळजवळ ७० लाख टन गहू निर्यात केली आहे. आणि २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात भारताने गहू निर्यातीतून तब्बल २.०५ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.

बापरे..! दोन गवा रेड्यांची झुंज; शेतकऱ्याचा ऊस भुईसपाट

सरकारने गहू उत्पादनाचा (Wheat Producer) जो काही अंदाज व्यक्त केला होता, त्यानंतर ५.७ टक्क्यांची त्यात कपात करण्यात आली. सुरुवातीला सरकारने १११.३२ लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. नंतर तो १०५ लाख टनांवर आणण्यात आला. असं असलं तरी यावर्षी भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश ठरला आहे.

आपल्याकडे मुबलक प्रमाणात गव्हाचा साठा उपलब्ध असल्याचं वाणिज्य मंत्रालयाने सांगितलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) १५ मेपर्यंत उष्ण लाटेचा अंदाज वर्तवला आहे. कोरड्या व उष्ण वाऱ्यामुळे राजस्थान, गुजरात आणि विदर्भाच्या काही भागात तापमान हे सरासरी ४६ ते ४७ अंशावर जाईल, असा आयएमडीचा अंदाज आहे. यापूर्वीच गहू निर्यातीसाठी केंद्र सरकारने एका टास्क फोर्सची स्थापन केली असल्याचे सांगितले आहे.

तसेच हा टास्क फोर्स वाणिज्य व उद्योग, रेल्वे, जलवाहतूक मंत्रालयासह निर्यात क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असलेला अपेडाच्या (APEDA) माध्यमातून निर्यातीसाठी प्रयत्न करत आहे. गहू निर्यातीच्या मुद्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या गहू उत्पादक राज्यांसोबत बैठका घेण्याचे नियोजनदेखील केले आहे.

महत्वाच्या बातम्या:
नांदेडच्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग यशस्वी; पीक पद्धतीत केला 'हा' बदल
बंपर ऑफर : तुम्ही 'या' ठिकाणी रॉयल एनफील्ड क्लासिक बुलेट फक्त 55 हजारांमध्ये खरेदी करू शकता

English Summary: The central government took a big decision regarding wheat exports; Exports to major countries of the world Published on: 13 May 2022, 06:01 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters