शेतकऱ्यांच्या मनोरंजनाचा प्रमुख मार्ग म्हणजे बैलगाडा शर्यत अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांसह बैलगाडा हौशी लोक प्रयत्न करत होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी सर्वोच न्यायालायने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली असून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्यात भरवण्यात आली आहे.
३ चारचाकी, १०३ दुचाकी, २२ तोळे सोने, दहा चांदीच्या गदा यासह लाखोंच्या बक्षिसांची लयलूट या स्पर्धेत होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले असून या चार दिवसांच्या स्पर्धेत दिड हजार बैलगाडे भाग घेणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या जाधववाडी व चिखली येथे केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २८ मे ला सकाळी सात वाजता शर्यतीचे उदघाटन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि विधानपरिषद सदस्य गोपींचद पडळकर, तर तिसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे शर्यतीला उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण ३१ तारखेच्या सकाळी सात वाजता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि श्री क्षेत्र नारायणपूरचे अण्णा महाराज यांच्या यांच्या हस्ते होणार आहे.
जवळजवळ दीड कोटी रुपयांच्या बक्षीसांसह दोन कोटी रुपये खर्च या भव्य बैलगाडा शर्यतीवर केला जाणार आहे. शर्यतीच्या बैलांचा रॅम्प वॉकही यानिमित्त देशात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या नंबराच्या बैलगाड्याच्या मालकाला १५ लाख रुपये रोख आणि एक बोलेरो जीप बक्षिसात मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेळीपालन अॅप: 'हे' मोबाइल अॅप शेळीपालनाबद्दल देतात चांगली माहिती, मिळेल दुप्पट नफा
शेतकऱ्यांनो डाळीतले किडे काढण्याची सोपी ट्रिक वापरा, एका मिनिटात होईल काम
माहिती महत्वाची, कडक माती मऊ करण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या...
Share your comments