1. बातम्या

बादल बरसला! शेतकऱ्याने चक्क 2 लाख 11 हजार रुपये देऊन खरेदी केला बैल, नाव ठेवले बादल आणि जिंकतोय सलग बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्ट ने उठल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
farmer purches ox in 2 lakh 11 thousand for bulockcart compitition

farmer purches ox in 2 lakh 11 thousand for bulockcart compitition

बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्ट ने उठल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. 

शेतकऱ्यांमध्ये बैलगाडा शर्यतीविषयी वेगळेच आकर्षण आणि मनामध्ये एक क्रेझ आहे. ज्या शेतकऱ्यांना बैलगाडी शर्यतीची हौस असते अशी शेतकरी कितीही किमतीचा बैल विकत घेण्याची तयारी ठेवतात आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या बाबतीत कधीही मागे पुढे पाहत नाहीत. त्याचे प्रत्यंतर सध्या  पाहायला मिळाले.  याबाबतचे सविस्तर बातमी पाहू.

नक्की वाचा:आता पाइपलाइनद्वारे पोहोचणार घराघरात गॅस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

 बैलगाडा शर्यतीसाठी विकत घेतला बैल

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील तरुण शेतकरी श्री. विशाल विद्याधर आहिरेयांनी बैलगाडा शर्यत आणि असलेली बैलांची हौस म्हणून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून चक्क 2 लाख 11 हजार रुपये मोजून  बैल खरेदी केलाव या बैलाचे नामकरण बादल असे केले.

 विशाल यांच्याकडे अगोदरच स्वतःचा घरचा सोन्या नावाचा बैल आहे. आता बादल आणि सोन्याची जोडी उत्तम जमली असूनहोणाऱ्या बैलगाडी शर्यतीसाठी ही जोडी तयार आहे.बादलला  पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी फार मोठी गर्दी केली असूनजिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नक्की वाचा:कुंपणच शेत खाते तेव्हा..!बुलढाण्यातील विचित्र प्रकार, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

 बादल घरी आला आणि त्याच्या नंतर सलग जिंकल्या दोन स्पर्धा

 बादल खरेदी करून घरी आल्यानंतर झालेल्या बैलगाडी शर्यत यांच्या दोन स्पर्धेत सहभागी झाला. 

यापैकी पहिले स्पर्धाही चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे होणा-या शर्यतीतही प्रथम क्रमांक पटकावला आणि दुसरी स्पर्धाही एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे प्रथम क्रमांक पटकावून प्रथम पारितोषिक जिंकले. सध्या बादलची मोठी चर्चा कळवाडी परिसरात आणि माळ माथा परिसरात जोरात सुरू आहे.

English Summary: farmer purchase ox in 2 lakh 11 thousand for bullock cart compitation Published on: 29 March 2022, 01:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters