Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांवरील (Farmers) संकटाची मालिका संपताना दिसत नाही. अगोदर मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि नंतर पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात (Kharip Season) निसर्गाचा लहरीपणाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
पाथरी (Pathari) तालुक्यातील नाथरा येथील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रामधून पेरणीसाठी सोयाबीन (soybeans) खरेदी केले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणीही केली, पीकही जोरात आले मात्र सोयाबीनला शेंगाचा आल्या नाहीत. नऊ एकर सोयाबीन शेतीमध्ये पिकाला शेंगा न आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे.
नाथरा येथील शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे बोगस सोयाबीनच्या बियांची तक्रार केली आहे. शेतकरी दिगंबर गंगाधर वाकणकर आणि ज्योती दिगंबर वाकणकर यांनी नाथरा शिवारात गट न 110 मधील 9 एकर शेतात सोयाबीन पेरणी (Soybean planting) केली होती.
कामाची बातमी! PF खात्यावर मिळणार पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी
पाथरी येथील गजानन कृषी सेवा केंद्रातून (Agricultural Service Centre) अंकुर सिड्स चे 5 बॅग आणि बूस्टर सिडस च्या 4 बॅग असे 9 नऊ बॅग सोयाबीन पेरणी केली होती सोयाबीन ची वाढ झाली आहे मात्र सोयाबीन ला सेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले बोगस बियाणे मुळे नुकसान झाले असून या बाबत शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे
खरीप हंगामातील पिकांवर अजूनही रोगाचे सावट आहे. तसेच मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने दर कडाडले आहेत.
Gold Price Today: खुशखबर! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर १० ग्रॅम सोने खरेदी करा ५९०० रुपयांनी स्वस्त...
नाथरा येथील शेतकऱ्यांने सोयाबीन ला सेंगा लागल्या नसल्याची तक्रार केली असून या बाबत कृषी अधिकारी यांच्या मार्फत तातडीने चौकशी केली जाणार आहे त्या नंतर तालुका तक्रार निवारण कमिटी मार्फत चौकशी होईल त्या नंतर कारवाई होईल.
- भाऊसाहेब खरात, गटविकास अधिकारी पाथरी
महत्वाच्या बातम्या:
भाजीपाल्यांचे दर कडाडले! शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस तर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! मुंबईसह या 21 जिल्ह्यांना इशारा
Share your comments