सध्या शेतात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. लवकरात लवकर उत्पन्न मिळावे, कमी खर्चात अधिकाधिक नफा व्हावा या दृष्टिकोनातून बरेच शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असतात. रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि नैसर्गिक खतांचा वापर वाढावा यासाठी अनेक उपाययोजना आखल्या जातात. तरीही बरेच शेतकरी रासायनिक खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर करतात.
वरोरा तालुक्यात रासायनिक खतांचा वापर करत असताना शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरोरा तालुक्यातील माळी परिसरातील जळका, वडगाव, वंदली या गावातील शेतकरी आणि शेतमजूर यांना रासायनिक खते देत असताना विषबाधा झाली आहे. उत्पन्न अधिक प्रमाणात यावे यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक खत देत असतात. मात्र आता शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर चांगलाच महागात पडला आहे.
वंदली गावातील १२ जणांना विषबाधा झाली आहे. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे. रितेश सतीश चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या भागात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. रासायनिक खत देताना शेतकरी व शेतमजुरांना चक्कर येणे, मळमळ होणे, अस्वस्थ वाटणे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
फवारणीनंतर विषबाधित झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना ताबडतोब खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही रासायनिक खत शेतकऱ्यांनी वंदली येथील कृषी केंद्रातून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित कृषी केंद्रातील रासायनिक खतांचा नमुना परीक्षणासाठी पाठविण्यात आला आहे शिवाय कृषी केंद्रातील ते खतही सील करण्यात आले आहे. अशी माहिती वरोरा तालुका, कृषी अधिकारी गजानन भोयर यांनी दिली.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार
शेतकरी रितेश सतीश चौधरी यांचा मृत्यू
वंदली येथील रितेश सतीश चौधरी पिकांना रासायनिक खत देत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही वेळ त्यांनी शेतात आराम केला. दरम्यान अचानक ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारार्थ सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
इंदापूरमध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान, 40 मेंढ्या अस्वस्थ
आजपासून बसणार महागाईचा चटका! 'या' गोष्टीसाठी मोजावे लागणार आजपासून जास्त पैसे, वाचा सविस्तर यादी
Share your comments