1. बातम्या

धक्कादायक ! कांदा न विकल्याने शेतकऱ्याने बाजार समितीतीच घेतले विष

कांदा न विकल्याने शेतकऱ्याने बाजार समितीतीच घेतले विष

कांदा न विकल्याने शेतकऱ्याने बाजार समितीतीच घेतले विष

श्रीरामपुर : शेतकरी अनेक संकटात सापडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. श्रीरामपुर तालुक्यातील शेतकऱ्याने कांदा विक्रीसाठी नेला होता. विक्रीसाठी आणलेल्या कांदा विकला न गेल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने विषारी औषध घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील टाकळीभान येथील उपबाजाराच्या आवारात काल रविवार (दि. १५) हा प्रकार घडला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या शेतकऱ्याला उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र जगधने यांनी दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान येथील उपबाजारात कांदा बाजार सुरु आहे. काल रविवारी तालुक्यातील गुजरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी भरत जाधव (वय ४०) यांनी आपला कांदा विक्रीसाठी उपबाजारात आणला होता.

Monsoon Arrive : खुशखबर ! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल

तीन आडत्यांकडे कांदा विक्रीसाठी लावला. मात्र काल लिलावाचा अधिकृत दिवस नसल्याने त्यांच्या नेहमीच्या आडतीवर कांदा गोणी फोडली असता तो माल विकला गेला नाही झाला.

विषारी औषधाची बाटली घेऊन उपबाजार विषारी औषध प्राशन केले. त्यावेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जाधव यांना उपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट

कांद्याच्या दरात दरवर्षी चढ-उतार होत असतात. असे असतानाही कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आता या नगदी पीकाबाबत शेतकऱ्यांची भूमिका बदलत आहे. कारण उत्पादन खर्च आणि वास्तविक उत्पन्न यात समतोल नाही. आता अनेक मंडईंमध्ये 1 रुपये किलोने विकला जात आहे. अशा परिस्थितीत कापणी आणि मालवाहतुकीचा खर्च जास्त होतो.

मात्र यावेळी शेतकर्‍यांना कांदा काढण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे जास्त मजुरी देऊन कांद्याची काढणी सुरू आहे. कांदा उत्पादक संघटना प्रशासनाकडे कांद्याला किमान 30 रुपये किलो दर देण्याची मागणी करत आहेत.

English Summary: Shocking! Due to non-sale of onion, the farmer took poison from the market committee Published on: 16 May 2022, 06:20 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters