1. हवामान

Monsoon Arrive : खुशखबर ! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल

सर्वांसासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सून (Monsoon) अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Monsoon Arrive

Monsoon Arrive

सर्वांसासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सून (Monsoon) अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र यांच्या माहितीनुसार अंदमानच्या समुद्रात आज मान्सून दाखल झाला आहे. नैऋत्य मॉन्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. सहा दिवस आधीच 16 मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे.

मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. आता मात्र त्याआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये या ठिकाणी 18 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील 9 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रास, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यातील इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुम्ही तुमचा UPI पिन विसरला, काळजी करू नका; अशा प्रकारे UPI सहज बदला

हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे.

English Summary: Monsoon Arrive: Good news! Monsoon enters the Andaman Sea Published on: 16 May 2022, 04:15 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters