1. हवामान

IMD Monsoon News : राज्यात पावसाचा अंदाज; 'या' नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट

IMD Mansoon News : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

IMD Monsoon News : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टी आणि राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Monsoon Arrive : खुशखबर ! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल

9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रास, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

7th pay commission ! सरकारच्या 'या' निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा

यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यातील इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

तुम्ही तुमचा UPI पिन विसरला, काळजी करू नका; अशा प्रकारे UPI सहज बदला

हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे.

राकेश टिकैत यांचे भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टीचे खरे कारण आले समोर..

English Summary: IMD Monsoon News: Rainfall forecast in the state Published on: 16 May 2022, 11:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters